Sambhajinagar Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Water Crisis : हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत; ३०० फूट खोल दरीत उतरून आणावे लागतेय पाणी 

Sambhajinagar News : अनेक अशी गाव आहेत; ज्या गावातला टँकरचा आधार आहे ना नळांचा आधार आहे. अशा गावातील नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून हंडाभर पाण्यासाठी खोलदरीमध्ये उतरावे लागत आहे

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील तापमान ४३ अंशाच्या वर पोहचले आहे. मात्र ४३ अंशावरच्या रखरखत्या उन्हात तब्बल ३०० फूट दरीत उतरून पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी कसरत करण्याची वेळ संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

मराठवाड्यात (Marathwada) सध्या भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हजारो टँकर मराठवाड्यांच्या रस्त्यावर दिसतायत. मात्र अनेक अशी गाव आहेत; ज्या गावातला टँकरचा आधार आहे ना नळांचा आधार आहे. अशा गावातील नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून हंडाभर पाण्यासाठी खोलदरीमध्ये उतरावे लागत आहे, अनेक किलोमीटर वणवण भटकंती करावी लागत (Water Scarcity) आहे. असेच काहीसे चित्र संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात सध्या पाहण्यास मिळत आहे. 

छत्रपती संभाजीनगरच्या (Sambhajinagar) सोयगाव तालुक्यातील सावरखेडा पांढरी गावातील नागरिकांना पिण्याच्या एक हंडा पाण्यासाठी सुमारे ३०० फूट खोल डोंगरात उतरून डोंगरातून येणाऱ्या झऱ्याचे पाणी आणावे लागते. दुष्काळाची ही दाहकता शब्दांपलीकडे आहे. हंडाभर पाण्यासाठी दोन- दोन तास उन्हात वाट काढून डोक्यावर घागरी घेऊन डोंगर चढून घरी यावे लागते. गावात टँकर येत नाही, टाकीमध्ये पाणी नाही, नळाचा पाण्याचा उपयोग नाही; अशा परिस्थितीमध्ये या एक फुटाच्या झऱ्यावर या गावकऱ्यांचे सर्व जीवन मरण अवलंबून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : धनलाभ होणार, हातात पैसा खेळता राहणार; 5 राशींच्या लोकांना बंपर लॉटरी लागणार

Maharashtra Politics : मी स्टार प्रचारक, खर्चाची अजिबात चिंता करू नका; ऐन निवडणुकीत भाजप नेत्याचं वक्तव्य, चर्चांना उधाण

Terror Attack: पाकिस्तान आखतोय भारताविरुद्ध कट; ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी पुन्हा सक्रिय

Murmura Chivda Recipe: घरीच १० मिनिटांत बनवा मुरमुरा चिवडा, चवीला होईल सर्वात भारी

Maharashtra Live News Update: दिल्लीतील शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी विट्यात निघाला कॅन्डल मार्च

SCROLL FOR NEXT