Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar : पुरात वाहून जाताना वाचविले; काही दिवसांचा राहिला सोबती, तरुणाला अखेर मृत्यूने गाठले

Sambhajinagar News : जैतपुर ‌वरुन पैठणखेडा गावात शेतातुन घरी येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने नदीच्या पात्रात एक शेतकरी तरुण बुडाला होता. ही घटना २८ सप्टेंबरला सकाळी घडली होती.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. त्यानुसार संभाजीनगर जिल्ह्यात देखील अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणखेडा येथील नदीत वाहून जाणाऱ्या एका तरुणाला‌ नदी बाहेर काढण्यात यश आले होते. मात्र, त्यात तो जखमी होऊन आजारी पडल्याने उपचारादरम्यान अखेर त्याचा आज मृत्यू झाला. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानुसार अतिवृष्टी काळात पैठण तालुक्यातील पैठणखेडा येथील गावानजीक असलेल्या कोल्ही नदीला देखील पूर आला होता. यात जैतपुर ‌वरुन पैठणखेडा गावात शेतातुन घरी येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने नदीच्या पात्रात एक शेतकरी तरुण बुडाला होता. ही घटना २८ सप्टेंबरला सकाळी घडली होती. 

एक तास प्रयत्न करून नागरिकांनी वाचविले प्राण 

गणेश रावसाहेब साबळे (वय ३२) हा शेतातून घरी परतत असताना वाहुन गेल्याची घटना घडली होती. यावेळी‌ नदीच्या काठावर असलेल्या शेतकरी व नागरिकांनी तब्बल एक तास प्रयत्न करत मोठ्या दोरीचे सहाय्याने त्याला पाण्याबाहेर काढत प्राण वाचविले होते. यानंतर पाण्यात बुडालेल्या गणेशला स्थानिक नागरिकांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे दाखल केले असता प्रथमोपचार करत शासकीय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे उपचार करिता दाखल केले होते.  

१७ दिवसांचा राहिला सोबती 

मात्र पुरात वाहून जात असताना तो जखमी झाला होता. तर तब्बल १७ दिवसांनी काविळ, टायफॉइड आणि छातीचे हाड व इतर ठिकाणी मोठ्या जखमा झाल्याने गणेश साबळे यांचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असुन शासनाने या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अशी मागणी नातेवाईकांच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT