Sanbhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : मी मेल्यावर तुम्हाला देखणी बायको मिळेल; लग्नानंतर ४ महिन्यांतच चिठ्ठी लिहून महिला डॉक्टरने मृत्यूला कवटाळलं

Sambhajinagar News : प्रतीक्षाला तिचा नवरा कशाप्रकारे त्रास द्यायचा हे सगळं वास्तव तिने या चिठ्ठीत नमूद केले आहे. शिवाय यामुळे आपली मानसिक स्थिती बिघडल्याचही तिने या चिठ्ठीत सांगितलं

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे संताप आणि चिंतेचा वातावरण असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिला डॉक्टरने पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रतीक्षा प्रीतम गवारे असे आत्महत्या केलेल्या (Doctor) डॉक्टर महिलेचे नाव आहे. प्रतीक्षा गवारे यांचे लग्न झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यातच या पत्नीने आपलं जीवन संपविले आहे. मात्र तिने (Sambhajinagar News) आत्महत्येपूर्वी सात पानांची सुसाईड नोट लिहून आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. प्रतीक्षाला तिचा नवरा कशाप्रकारे त्रास द्यायचा हे सगळं वास्तव तिने या चिठ्ठीत नमूद केले आहे. शिवाय यामुळे आपली मानसिक स्थिती बिघडल्याचही तिने या चिठ्ठीत सांगितल. 

पतीविरोधात गुन्हा दाखल 

दरम्यान या संपूर्ण प्रकरणी पती डॉ. प्रीतम गवारे याच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला दवाखान्यात दाखल केल्यानंतर डॉक्टर पती पसार झाला होता. इतकेच नाही तर पत्नीच्या अंत्यविधीला देखील तो आला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT