Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Water Crisis : मराठवाडा होतोय टँकरवाडा; आठ जिल्ह्यातील २७८ गावांना ४३३ टँकरने पाणी

Sambhajinagar News : उन्हाच्या वाढत्या झळांमध्ये पाणीटंचाईची समस्या देखील तितकीच गडद होत चालली आहे. मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये हे चित्र अधिक

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : राज्यात भीषण पाणीटंचाईची समस्या जाणवत असताना मराठवाड्यात पाणीटंचाईचे चित्र अधिक गडद होत चालले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील २७८ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत असून या २७८ गावांची आणि ९९ वाड्यांची तहान ४३३ टँकरने भागवली जात आहे. हे चित्र आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

उन्हाच्या वाढत्या झळांमध्ये पाणीटंचाईची समस्या देखील तितकीच गडद होत चालली आहे. मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये हे चित्र अधिक आहे. यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील तहानलेली २७८ गावे आणि ९९ वाड्यांना मिळून ४३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

अशी आहे ट्रॅकरची स्थिती 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १७७ गावे आणि ३१ वाड्यांसाठी २५७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जालना जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होत असून ७० गावे आणि १९ वाड्यांना १२० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. नांदेड जिल्ह्यातील ६ गावे व २१ वाड्यांना १८ टँकरने, तर बीड जिल्ह्यात १८ गावे आणि २३ वाड्यांना २६ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. परभणी जिल्ह्यातील एका गावाला, तर हिंगोली जिल्ह्यातील २ वाड्यांना १ टँकर, लातूर जिल्ह्यातील २ गाव आणि ३ वाड्यांना मिळून ३ टँकर, तर धाराशिव जिल्ह्यातील ४ गावांना ७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

७५५ विहिरींचे अधिग्रहण
प्रशासनाने ७५५ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले असून यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८५, जालना १४७, परभणी १९, हिंगोली ६५, नांदेड १६८, बीड ६५, लातूर ४४, आणि धाराशिव जिल्ह्यात ५९ विहिरींचा समावेश आहे. टँकरसाठी २०२ गावांतील २३९ विहिरींचे, तर टँकरव्यतिरिक्त ४२२ गावांतील ५१६ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

जालना शहराला आज पाणीपुरवठा नाही
जालना
: जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी पाणीपुरवठा योजनेवरील पाईपलाईन अंबड - पैठण मार्गावर फुटली आहे. त्यामुळे आज जालना शहराला पाणीपुरवठा केला जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. जायकवाडी ते जालना पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटण्याचे प्रकार सतत घडत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT