Viral Video: तरुणी पुलाच्या कठड्यावर चढली, ७० फुटांवरून मारली उडी अन्...; थरारक व्हिडिओ

Uttar Pradesh Viral Video: उत्तर प्रदेश येथील धक्कादायक आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलीचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरूणी गंगा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
UP News
UP NewsSaam Tv News
Published On

हापुड, उत्तर प्रदेश येथील धक्कादायक आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरूणी गंगा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तरूणीनं ७० फूट उंचीवरून उडी मारल्याची माहिती आहे. मात्र देव बलवत्तर म्हणून तरूणीचे प्राण वाचले. गंगा नदीत पाणी कमी असल्यामुळे तिचा जीव वाचला.

घरगुती वादातून एका तरूणीनं जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केलाय. तिने आत्महत्या करण्यासाठी ब्रजगाठ गाठले. अन् ७० फूट पुलावरून गंगा नदीत उडी मारली. तरूणी गंगेत उडी मारत असल्याचं पाहून स्थानिकांनी नदीजवळ धाव घेतली. स्थानिकांची सर्तकता आणि गंगा नदीत पाणी कमी असल्यामुळं तिचे प्राण वाचले. या घटनेचा लाइव्ह व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होत आहे.

UP News
Uttar Pradesh: योगी सरकारमधीले एकमेव तरुण मुस्लिम मंत्री कोण आहेत?

ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. घरात वाद झाल्यानंतर तरूणी ब्रजघाटावर पोहोचली. ती पुलावरील लोखंडी जाळीवर चढून कठड्यावर बसली. यावेळी एका व्यक्तीनं आरडाओरडा केला. तरूणीला वाचवण्यासाठी जवळ पोहचताच मुलीनं लगेच गंगा नदीत उडी घेतली. दरम्यान घाटावर उपस्थित चंद्रभान, विशाल, रोशन, राजू, विनोद, कुंवरलाल, मुकेश, दिपचंद आदी स्थानिकांनी अथक प्रयत्न करीत मुलीचे प्राण वाचवले.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ब्रजघाट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुलीच्या भावाला घटनास्थळी बोलावून घेतलं. नंतर नातेवाईक मुलीला सोबत घेऊन घेतलं. कौटुंबिक वादातून तरूणीनं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. सध्या तरूणीचा आत्महत्या करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com