Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Water Crisis : पाणीटंचाईची तीव्रता वाढली; जायकवाडी धरण परिसरातील गावातच भीषणता

Sambhajinagar News : उन्हाळ्याची चाहूल सुरु झाल्यानंतर पाण्याची समस्या सर्वत्र जाणविण्यास सुरवात होत असते. धरण, तळे यात साचलेल्या पाण्याचे उन्हामुळे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी कमी होत असते

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात उन्हाचा चटका दररोज वाढू लागला आहे. त्यात आता अनेक गावात, वाडी- वस्त्यांवर पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. मार्च महिन्याच्या मध्यातच संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे येथे  पाणीटंचाईमुळे पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू झाली आहे. महिलांसह लहान मुली देखील दूरवरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी वाहत आहेत. 

उन्हाळ्याची चाहूल सुरु झाल्यानंतर पाण्याची समस्या सर्वत्र जाणविण्यास सुरवात होत असते. धरण, तळे यात साचलेल्या पाण्याचे उन्हामुळे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी कमी होत असते. परिणामी पाण्याचे स्रोत आटल्याने पाणी टंचाई जाणवत असते. राज्यातील अनेक भागात याची सुरवात झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. प्रामुख्याने मराठवाड्यात पाणीटंचाईची भीषणता अधिक पाहण्यास मिळत आहे.  

पाणी योजना नसल्याने दरवर्षीची समस्या 

संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात जायकवाडी धरण आहे; त्याच परिसरातील गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याची अवस्था आहे. गावातील महिलांना दूरवरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार मागणी करूनही कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची योजना गावात सुरू झालेली नाही. यामुळे दर उन्हाळ्यामध्ये गावकऱ्यांचे पाण्यासाठी हाल होतात. 

पाऊस चांगला तरी टंचाई 

गावात पाणी नसल्यामुळे इतर गावातील नागरिक आपल्या मुलींचे लग्न या गावातील मुलांशी लावत नसल्याचे गावकरी सांगतात. यंदाच्या वर्षात चांगला पाऊस झाला असला तरीही पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे गावात भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. अक्षरशः महिलांना एक ते दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याची वेळ आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT