Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : कुटुंब लग्न समारंभात असताना संसार उध्वस्त; शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

Sambhajinagar News : शॉर्टसर्किट होऊन त्यांच्या घराला आग लागली. या आगीत कुटुंबातील संपूर्ण संसार हा जळून खाक झाला

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : घर बंद असताना रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन घराला आग लागली. या आगीत (Fire) तीन कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले असून यात रुपयांचे नुकसान झाले आहे. हि घटना संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील लामकाना वाडी येथे घडली आहे. (Live Marathi News)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरात असणाऱ्या लामकाना वाडी येथील तीन कुटुंबीय लग्न (Marriage) समारंभासाठी बाहेर गेले होते. त्यादरम्यान शॉर्टसर्किट होऊन त्यांच्या घराला आग लागली. या आगीत कुटुंबातील संपूर्ण संसार हा जळून खाक झाला असून या मध्ये  ५० क्विंटल अद्रकचे बियाणे, १०० क्विंटलच्यावर कापूस, रोख रक्कम, सोने नाणे, कपडे आणि मुलांची पुस्तके संपूर्ण जळून खाक झाली आहे. यामध्ये साधारण लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुदैवाने हानी टळली 

आगीच्या घटनेबाबत अग्निशमन विभागाला (Fire Brigade) कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी तातडीने दाखल होऊन आग विझविण्यात आली. मात्र तोपर्यंत संपूर्ण संसार जळून खाक झालेला होता. दरम्यान तिन्ही कुटुंबातील सर्व सदस्य बाहेरगावी असल्याने या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mousse Cake Recipe: घरच्या घरी बनवा क्रीमी आणि चॉकलेटी मूस केक; बेकिंगशिवाय तयार होईल स्वादिष्ट डेझर्ट

Gold Price Today : ग्राहकांसाठी मोठा झटका! सोन्याच्या किमतीत १९,००० रुपयांची वाढ; सोन्याचे किंमतीने मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड?

Organ donation: दरवर्षी 4-5 लाखांना अवयव प्रत्यारोपणाची गरज; 10 टक्क्यांहून कमी रुग्णांना लाभ, रुग्णालयाचा जनजागृतीसाठी पुढाकार

पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली, लाठ्या-काठ्या अन् विटांनी बेदम मारलं, व्हिडिओ पाहून थरकाप उडेल

Maharashtra News Live Update: चाकणच्या रस्त्यांना नवं तंत्रज्ञान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कामांची पाहणी करणार

SCROLL FOR NEXT