Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : तु एकटी आहेस का, मोबाईल नंबर दे..; रिक्षा चालकाने काढली प्रवासी तरुणीची छेड

तु एकटी आहेस का, मोबाईल नंबर दे..; रिक्षा चालकाने काढली प्रवाशी तरुणीची छेड

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा रिक्षात तरुणी, महिलांचा प्रवासाच्या (Sambhajinagar) सुरक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. रिक्षा चालकाने प्रवासी तरुणीला आक्षेपार्ह प्रश्न करुन स्पर्श करण्यापर्यंत मजल मारल्याची संतापजनक घटना उघडकीस आलीय. शेख वसीम शेख सलीम असे आरोपीचे नाव (police) असून त्याला अटक करण्यात आली आहे. (Maharashtra News)

संभाजीनगर शहरातील कार्तिकी सिग्नलवरुन २१ वर्षीय तरुणी घरी जाण्यासाठी रिक्षात बसली होती. चालकाने मात्र काही वेळातच तिची चौकशी सुरू केली. एकामागे एक वैयक्तिक चौकशी सुरू केली. तरुणीला त्याच्या प्रश्नाने अवघडल्यासारखे वाटले. सुरूवातीला तिने उत्तर देणे टाळले. मात्र, चालकाने नंतर थेट (Crime News) अश्लिल प्रश्न विचारायला सुरूवात केली. काहीतरी कारण करुन मागे हात करुन तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करु लागला. त्याचे वागणे कळाल्याने बाबा चौकातून बसलेला एक प्रवासी नगरनाक्याला उतरताच स्नेहाने तेथेच उतरण्याचे ठरवले.

रिक्षातून उतरून थेट पोलिसात

प्रवासी रिक्षात असताना वसीमने मागे हात करत घाणेरडा स्पर्श केला. स्नेहाने मात्र धीर धरला. नगरनाक्यावर उतरुन तिने थेट पोलिस ठाणे गाठले. क्रांतीचौकचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिल्या. तर दुसरीकडे चालकाला शोधण्याच्या सुचना केल्या. यानंतर अवघ्या अडीज तासात पोलिसांनी वसीमला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Live News Update: फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारल्याने वॉचमनने केली मारहाण

Acidity: अ‍ॅसिडिटीला त्रासलात? तर करा 'हे' सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम

मोठी बातमी! रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?

नवीन व्यवसाय सुरू कराल, भाऊबीजेला नातेबंध आणखी पक्के होईल; ५ राशींच्या लोकांसाठी स्मरणात राहणारा दिवस ठरणार

SCROLL FOR NEXT