Nandurbar News : अवकाळी पाऊस, नैसर्गिक संकटामुळे नुकसान; शेतकरी आजही मदतीपासून वंचित

अवकाळी पाऊस, नैसर्गिक संकटामुळे नुकसान; शेतकरी आजही मदतीपासून वंचित
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात सहा वेळेस झालेल्या पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे (Farmer) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आले होते. मात्र अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी नुकसान (Nandurbar) भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र दुसरीकडे प्रशासनाच्यावतीने केवायसी नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्या दुर्लक्षामुळे हजारो शेतकरी आजही मदतीपासून वंचित आहेत. (Live Marathi News)

Nandurbar News
Sambhajinagar News : प्रेम प्रकरणातून चौदाव्या वर्षीच मुले सोडताहेत घर; ६ महिन्यांत १३४ मुले गेली पळून

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सरकारने नुकसानी ते पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन केले होते. मात्र सहा महिन्यानंतरही जिल्ह्यातील अनेक शेतकरी आजही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळेल? असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत.

Nandurbar News
Maharashtra Weather Alert: राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पावसाची नोंद; मुंबईसह पुण्यात आज कसा असेल पाऊस?

सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अनेक शेतकऱ्यांनी दिलेले बँक अकाउंट नंबर चुकीचे आहेत. तर काही शेतकऱ्यांचे केवायसी न झाल्याने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळण्यास दिरंगाई होत असल्याचे कारण नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहे.

Nandurbar News
Beed Crime News: विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी; बीडमधील संतापजनक घटना

मंत्र्यांनी नुकसान झालेल्या भागात पाणी दौरे केले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दावा केला. झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून त्वरित नुकसान भरपाई देण्याचाही शब्द शेतकऱ्यांना दिला गेला. मात्र अजूनही हजारो शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा का करावी लागत आहे. अशी संतप्त भावना शेतकऱ्यांमध्ये आहे सरकार आणि प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवतो का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com