Maharashtra Weather Alert: राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पावसाची नोंद; मुंबईसह पुण्यात आज कसा असेल पाऊस?

Maharashtra Rain News: त्याचबरोबर मुंबईसह उपनगर ठाणे, पालघर या जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
Rain Update
Rain Update Saam Tv
Published On

Maharashtra Rain Updates: राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. पुण्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. अशात काल कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र आज अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी असल्याचं पहायला मिळणार आहे.(Latest Weather Update News)

सध्या राज्यातील कोकण (Kokan) विभागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर मुंबईसह उपनगर ठाणे, पालघर या जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह आज उपनगरांमध्ये हलका ते मध्यम पावसाच्या सरी बरसतील. कोकणातही पुढील ४ ते ५ दिवसांत पावसाचा (Rain) जोर कमी असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Rain Update
Maharashtra Rain Alert: विदर्भ आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्यात अत्तापर्यंत सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाकडून (Weather Department) देण्यात आलीये. यंदाच्या मोसमी पावसावर "एल निनो"चे सावट आहे. प्रशांत महासागरात एल निनो स्थिती निर्माण झाली आहे. एल निनो स्थितीमुळे मोसमी पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. मात्र, हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, देशात सरासरीइतकाच पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पहिल्या दमदार पावसात अमरावतीत रस्त्यावर खड्डे, वाहन चालकांची तारांबळ

विदर्भात सर्वत्र दमदार पाऊस झाल्यानंतर अमरावतीत रस्त्यांची दुरावस्था पाहायला मिळाली आहे. अमरावती शहरात पहिल्यांदा दमदार पाऊस झाल्यानंतर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल ते मालटेकडी रस्त्यावर वाहनचालक खड्यातून वाट काढताहेत. सध्या पावसाच्या पाण्याने खड्डे भरले असल्याने वाहन चालकाची कसरत होते आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहेत.

Rain Update
Maharashtra Political Weather Update: राज्यात राजकीय भूकंप, राष्ट्रवादीत फूट, अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी; दिवसभरात काय घडलं आणि पुढे काय घडेल?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com