Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar : उपोषण सोडण्यासाठी आंदोलक पालकमंत्र्यांच्या घरी; शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मागणीसाठी सुरु होते आंदोलन

Sambhajinagar News : कन्नड तहसील कार्यालयासमोर १० ऑक्टोबरपासून एका व्यक्तीने बेमुदत उपोषण केले होते. हे उपोषण नवव्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन मागे

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी; अशी मागणी होत आहे. याच मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये उपोषण सुरु करण्यात आले होते. मात्र हे सुरू केलेले उपोषण थेट पालकमंत्र्यांच्या घरी छत्रपती संभाजी नगर शहरात सोडल्याची अजब घटना घडली आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील संदीप विजयकुमार सेठी या व्यक्तीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पंजाब सरकार प्रमाणे सरसकट नुकसान भरपाई द्यावी, पूरग्रस्त मृतांच्या कुटुंबीयांना तातडीची मदत करावी, सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, सरसकट कर्जमाफी जाहीर करून नवीन कर्ज मंजूर करावे, बँक वसुली वर्षभरासाठी स्थगित करावी; आदी मागण्यांसाठी १० ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले.

या दहा दिवसांच्या उपोषणात तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांनी सेठी यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली. परंतु त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट जोपर्यंत उपोषणस्थळी येऊन आश्वासन देणार नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही; अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे प्रशासनाची गोची झाली. या कालवधीत सेठी यांच्यावर उपोषणस्थळीच उपचार देखील करण्यात आले होते. शेवटी शनिवार आणि रविवार शासकीय सुट्टी आहे. त्यानंतरही दिवाळीच्या सुट्टया आहेत. त्यामुळे शासकीय अधिकारी, कर्मचारी सुट्टीवर असतील, त्यामुळे उपोषण मागे घेण्यात यावे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

उपोषण सोडण्यासाठी कन्नडहून आणले संभाजीनगर 

तहसीलदार विद्याचरण कडवकर व शिवसेनेचे उपसंघटक शिवाजी थेटे यांनी पालकमंत्री शिरसाट यांच्या सहायकांशी संपर्क साधला. यावेळी पालकमंत्र्यांचे बिझी शेड्युल आहे. त्यामुळे त्यांना कन्नडला येणे शक्य नाही, असे सांगण्यात आले. उपोषणकर्त्यांना इकडे छत्रपती संभाजीनगरला पालकमंत्र्यांच्या घरी आणा. इथेच उपोषण सोडवू, असा निरोप देण्यात आला. त्यानंतर उपोषणकर्त्याला थेट छत्रपती संभाजीनगर शहरातील पालकमंत्री यांच्या घरी आणून उपोषण सोडले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरला जाण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर एका रुग्णवाहिकेमध्ये उपोषणकर्ते संदीप सेठी हे डॉक्टर आणि काही कार्यकर्त्यांसह छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panhala History: सह्याद्रीच्या वैभवात महाराष्ट्राचे ऐतिहासिक रत्न, पन्हाळा गडाचा इतिहास

Weight Gain: झोपेच्या अभावामुळे वजन वाढते? जाणून घ्या कारण

Shaniwar Wada Namaz Row : भाजप खासदार मेधा कुलकर्णींना अटक होणार? पुण्यातील शनिवारवाडा प्रकरण तापलं

Isha Malviya: स्टाइल जो दिल जीत ले! ईशा मालवीयाचा ट्रेंडी एथनिक लूक

मतदार यादीमध्ये बोगस नावं कोणी टाकली? आरोपानंतर आमदार गायकवाडांचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT