Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : प्रवाशांनी भरलेल्या खासगी बसला भीषण अपघात; ट्रकची जोरदार धडक, ३० प्रवासी जखमी

Sambhajinagar News : इसारवाडी फाटा येथे विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने ट्रॅव्हल्सला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. मध्यरात्री अडीच ते तीन विजेच्या सुमारास अपघात झाला आहे. यावेळी प्रवासी गाढ झोपेत होते

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : प्रवाशांची भरून जात असलेल्या खासगी बसला ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. ट्रकची धडक दिल्यानंतर ट्रॅव्हल्स रस्त्याच्या खाली उतरली होती. मात्र या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील ३० प्रवासी जखमी झाले असून दैव बलबत्तर म्हणून सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी बचावले आहेत. 

छत्रपती संभाजीनगर- पुणे महामार्गावर ईसरवाडी फाटा येथे ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. खाजगी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स महामार्गाने जात असताना इसारवाडी फाटा येथे विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने ट्रॅव्हल्सला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. मध्यरात्री अडीच ते तीन विजेच्या सुमारास अपघात झाला आहे. यावेळी प्रवासी गाढ झोपेत होते. 

३० प्रवासी जखमी 

ट्रकची धडक बसल्यानंतर ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी घाबरले होते. यानंतर बसमध्ये धावपळ सुरु झाली होती. दरम्यान अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यात ३० प्रवासी हे किरकोळ जखमी झाले आहे. जखमी प्रवाशांवर उपचार करून त्यांना पुढच्या मार्गाला रवाना करण्यात आले. या अगोदरही ईसारवाडी फाटा येथे अपघात झालेले आहेत.

नियंत्रण सुटून कार खड्ड्यात 

छत्रपती संभाजीनगर- पुणे महामार्ग वर गोलवाडी फाटा येथे कारचा अपघात. छत्रपती संभाजीनगर कडून पुण्याकडे जात असताना गोलवाडी फाटा येथे कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात गेली. यामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. कारचा वेग जास्त असल्याने कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले होते; अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: नवऱ्याने बायकोला जिवंत जाळलं, घराचा दरवाजा बंद करून काढला पळ; चंद्रपूर हादरले

Kitchen Tips : थंडीत भांडी धुताना हात गारठणार नाही, वापरा या सोप्या टिप्स

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर

Cholesterol Diet Mistakes: कोलेस्टेरॉल कमी करताय, पण 'ही' एक सामान्य चूक ठरू शकते घातक; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

Beed Politics: मोठी बातमी! बीडमध्ये नवं राजकीय समीकरण, राष्ट्रवादी- शिवसेनेची MIM सोबत युती

SCROLL FOR NEXT