NEET Result Saam tv
महाराष्ट्र

NEET Result : नीट परीक्षेच्या निकालाविरोधात संभाजीनगरात याचिका दाखल; १८ जूनला होणार खंडपीठात सुनावणी

Sambhajinagar News : नीट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याच्या प्रकारावरून विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहे. राज्यभरात ठीकठिकाणी विद्यार्थ्यांनी एकत्र येत निदर्शने देखील केली

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 
छत्रपती संभाजीनगर
 : नीट परीक्षेमध्ये उडालेल्या गोंधळानंतर राज्यभरासह संपूर्ण देशभरात नीटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. नीट परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी. तसेच जिथे प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच बाहेर पसरली तेथे ही परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश द्यावेत; अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगरच्या खंडपीठात सादर करण्यात आली. 

नीट परीक्षेचा (NEET Exam) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याच्या प्रकारावरून विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहे. राज्यभरात ठीकठिकाणी विद्यार्थ्यांनी एकत्र येत निदर्शने देखील केली. या सर्व गदारोळात प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा सूर आता उमटायला सुरुवात झाली. त्यामुळे नीट परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी आणि जिथे प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच बाहेर पसरली तेथे ही परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर (Sambhajinagar) खंडपीठात सादर करण्यात आली. 

१८ जूनला सुनावणी 

खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर १८ जूनला सुनावणी होणार असून संपूर्ण विद्यार्थ्यांचे (Student) लक्ष आता या सुनावणीकडे लागले आहे. निकिता विजय खंदारे आणि इतर तिघांनी ऍड. रामाराव बिरादार यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. दरम्यान नीट परीक्षेच्या निकालाची नियोजित तारीख १४ जूनला होती. मात्र तत्पूर्वीच हा निकाल जाहीर करण्यात आला असून हे सर्व संशयास्पद असल्याचही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT