Sambhajinagar News
Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News: अडीच महिन्यांपासून नाही पाणी; महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्याचे दिवस सुरु असताना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यंदा पावसाळा (Sambhajinagar) चांगला न झाल्याने पाण्याची समस्या जाणवत आहे. यात मागील अडीच महिन्यापासून गावात पाणी पुरवठा करण्यात आला नाही. यामुळे संतप्त महिलांनी आज (Grampanchayat) ग्राम पंचायतीवर हंडा मोर्चा काढला. (Tajya Batmya)

संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ७४ जळगाव, खाम जळगाव, शहापूर मानेगाव या ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत काही प्रभागात रोज पाणी सोडले जात होते. पण, एका वस्तीतील प्रभागात अडीच महिन्यांपासून ग्रामपंचायतीने पाणी सोडले नाही. त्यामुळे या परिसरातील महिलांनी हंडा मोर्चा काढला होता. 

दोन दिवसात पाणी सोडण्याचे आश्वासन 

७४ जळगाव ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत एका वस्तीमध्ये तब्बल अडीच महिन्यांपासून पाणी पुरवठा करण्यात आला नाही. परिणामी, या भागातील ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत असून आज महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. त्यावर ग्रामसेवकाने दोन दिवसांत पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur Loksabha Election 2024: कोण होणार शिरूरचा खासदार?, अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

Sujay Vikhe Ahmednagar | सुजय विंखेंचं पावसात भाषण!

Today's Marathi News Live : नवनीत राणांच्या मेळाव्याला बोलवून पैसे न दिल्यामुळे महिलांचा गोंधळ

Mother's Day Gift: मदर्स डेला तुमच्या आईला द्या गिफ्ट; कमी किंमतींचे खास गिफ्ट

Dhananjay Munde Speech Beed | पुष्पा पिक्चर! धनंजय मुंडे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT