Amravati News : सोयाबीन भाववाढीसाठी चक्काजाम आंदोलन

Amravati News: सोयाबीन भाववाढीसाठी चक्काजाम आंदोलन
Amravati News
Amravati NewsSaam tv
Published On

अमर घटारे 

अमरावती : नवीन सोयाबीन काढणीला सुरवात झाली आहे. परंतु मार्केटमध्ये शेतकऱ्याला सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नाही. यामुळे सोयाबीनच्या (Soyabean) भाव वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Amravati) अमरावती जिल्ह्यतील धामणगाव रेल्वे येथे चक्काजाम आंदोलन केले. (Tajya Batmya)

Amravati News
Dhule News : गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

यावर्षी सोयाबीन पिकावर विविध रोगांच्या प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. त्यात सध्या बाजारात सोयाबीनला ४ हजार दोनशे रुपये भाव मिळत आहे. हा भाव मिळत असल्याने उत्पदनासाठी लावलेला खर्च देखील निघत नसल्याचे चित्र आहे. यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल ८ हजार रुपये भाव मिळावा, अमरावती जिल्ह्यात सर्व शेतकऱ्यांना पिक विमा लागू करावा. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी (Farmer) संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. 

Amravati News
Kalyan News: हल्ला करत लांबविले मंगळसूत्र; चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वाहतूक रोखली 

सोयाबीनच्या भाववाढीसाठी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या दरम्यान काही वेळासाठी धामणगाव ते मंगरूळ दस्तगीर रस्ता अडवत चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक अडकली होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com