Chatrapati Sambhajinagar Saam tv
महाराष्ट्र

Chatrapati Sambhajinagar News : गॅस गळती प्रकरणात मनपा वसूल करणार ९ लाख; एचपीसीएल कंपनीला बजावली नोटीस

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात १ फेब्रुवारीला झालेल्या गॅस गळती झाली होती. या गॅस गाळातील कारणीभूत असणाऱ्या एचपीसीएल (Sambhajinagar) या कंपनीला जबाबदार धरून या कंपनीकडून आता मनपा ९ लाख रुपये वसूल करणार आहे. या संदर्भात मनपाने नोटीस देखील बजावली आहे.  (Tajya Batmya)

छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवरील सिडकोजवळ एचपीसीएल कंपनीच्या टँकरमधून गॅस गळती झाली होती. गॅस गळती झाल्यामुळे सर्वत्र घबराट पसरली होती. (Gas) गॅस गळती झाल्यानंतर मनपाच्या मनुष्यबळाचा वापर आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला होता. दरम्यान या घटनेमुळे मनपा आणि पोलीस (Police) प्रशासनाकडून जवळपास १२ ते १३ तास रेस्क्यू ऑपरेशन चालविण्यात आले होते. यामुळे संभाजीनगर शहरातील मोठा अनर्थ टळला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लागलेला खर्च करणार वसूल 

महापलिकडून राबविण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी महापालिकेने आपली यंत्र सामुग्री व मनुष्यबळाचा वापर केला होता. यासाठी सुमारे ९ लाख रुपयांचा खर्च झाला होता. त्यामुळे हा खर्च वसूल करण्यासाठी अग्निशमन विभागाकडून एच.पी.सी.एल कंपनीला ९ लाख रुपये भरण्याची नोटीस बजावण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: प्रेमासाठी काय पण..! बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं अन् कुलूप लावलं, लेकीचा प्रताप पाहून कुटुंबीय चक्रावले VIDEO

Malvan Statue Incident: मालवणमधील शिवरायांचा पुतळा दुर्घटनेत मोठी कारवाई! उत्तर प्रदेशमधून तिसऱ्या आरोपीला अटक; पोलीस कोठडीत रवानगी

PM Kisan Yojana: बळीराजासाठी केंद्राची खास योजना! मिळतात ६ हजार रुपये; जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

Baba Siddiqui Death:सलमान खानला मारण्याची सुपारी, पानिपतमधून पनवेल पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT