Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : बस चालक- वाहकाला जबर मारहाण; संभाजीनगरातील घटना, कर्मचाऱ्यांनी केला चक्काजाम

Sambhajinagar News : बस बाहेर निघाली असताना बसस्थानका जवळील बिल कॉर्नर चौकामध्ये सिग्नलवर एका कार चालकाने बसच्या समोर गाडी आडवी लावून अरेरावी करण्यास सुरवात

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य बसस्थानकामध्ये महामंडळाच्या बस चालक आणि वाहकाला एका कारचालकाने जबर मारहाण केली. बसस्थानकापासून काही अंतरावर हा प्रकार घडल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी जवळपास तासभर चक्काजाम आंदोलन केले. 

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) मुख्य बसस्थानकातून जाफराबाद- पुणे बस बाहेरगावी जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. बस बाहेर निघाली असताना बसस्थानका जवळील बिल कॉर्नर चौकामध्ये सिग्नलवर एका कार चालकाने बसच्या समोर गाडी आडवी लावून अरेरावी करण्यास सुरवात केली. यानंतर कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघांनाही जबर मारहाण (Crime News) केल्यानंतर ते दोघेही बसस्थानकामध्ये आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मात्र गोंधळ निर्माण झाला होता. 

दरम्यान हा प्रकार समजल्यानंतर महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त करत बसस्थानकात चक्का जाम आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जो कोणी व्यक्ती आहे. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल; असे आश्वासन दिल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी चक्काजाम मागे घेऊन बस सेवा सुरळीत सुरू ठेवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway New Service: दिलासादायक! रेल्वे प्रवासी ताण तणावातून मुक्त होणार, CSMT स्टेशनवर नवी सुविधा सुरू

Maharashtra Live News Update : विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपुरात रोड शो

भाजप उमेदवाराच्या मुलाची अजित पवारांच्या कार्यकर्त्याला मारहाण, VIDEO

एकेकाळची ‘नॅशनल क्रश’ अभिनेत्री शिवसेनेची मशाल घेऊन मैदानात, ठाकरेंसाठी मुंबईत दारोदारी करतेय प्रचार

Viral Video: भारतात राहणाऱ्या विदेशी व्यक्तीने २ महिन्यांनी साफ केला एअर प्युरीफायर, फिल्टरच्या आता जे दिसलं....!

SCROLL FOR NEXT