Mother Push Out Of House By Children Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News: आईला धक्काबुक्की करत घराबाहेर काढलं, कोर्टाने ३ मुलं अन् सुनेला दिला मोठा दणका

Mother Push Out Of House By Children: वयोवृद्ध महिला सांभाळ न करणाऱ्या आणि घराबाहेर काढणाऱ्या ३ मुलांसह सुनेला कोर्टाने दंड ठोठावला आहे.

Priya More

रामू ढाकणे, संभाजीनगर

वयोवृद्ध आईचा सांभाळ न करणाऱ्या मुलं आणि सुनेला कोर्टाने दंड ठोठावला आहे. या वयोवृद्ध महिलेच्या ३ मुलांसह सुनेला प्रत्येकी २० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले. छत्रपती संभाजीनगरच्या प्रथम वर्ग न्यायालयाने हा आदेश दिले आहेत. दंडाची रक्कम १४ दिवसांच्या आत न्यायालयात जमा करण्याचेही आदेश कोर्टाने यावेळी दिले.

छत्रपती संभाजीनगर शहरातील हडकोमध्ये राहणाऱ्या ६५ वर्षीय जयश्री एकनाथ खोतकर यांना ३ मुलं आणि एक मुलगी आहे. त्या आपल्या तीन मुलांसोबत राहतात. तर त्यांच्या मुलीचे लग्न झाले असून ती सासरी राहते. जयश्री खोतकर यांना त्यांची तिन्ही मुलं सांभाळत नव्हती. त्यांनी मारहाण करत आईला घराबाहेर काढले आणि पुन्हा घरी येऊन नको असे सांगितले. जयश्री खोतकर यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

जयश्री खोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना उच्च रक्तदाब आणि मूळव्याधाचा त्रास आहे. त्यांची मुले त्यांचा व्यवस्थित सांभाळ करीत नव्हते, त्यांना खाण्यापिण्यास देखील देत नव्हते, त्यांना वारंवार घराबाहेर काढत होते. आजारी असल्याने त्यांनी मुलांना दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले. मात्र मुलांनी त्यांना दवाखान्यात नेले नाही. त्यांना खायला दिले नाही उलट धक्काबुक्की करून शिवीगाळ केली.

'आम्ही तुला सांभाळणार नाही' असे म्हणत घराबाहेर काढून दिले. 'घरी परत आल्यास मारहाण करू' अशी धमकी दिली. जयश्री खोतकर या आजारी असल्याने त्यांना त्यांची मुलगी सुनीता शिरसाठ यांनी औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. जयश्री खोतकर यांनी मुलांच्या त्रासाला कंटाळून शेवटी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी जयश्री यांची तीन मुलं आणि एका सुनेविरोधात गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी चौघांना अटक केली होती. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता कोर्टाने तिन्ही मुलं संदीप एकनाथ खोतकर , सचिन एकनाथ खोतकर, सुनील एकनाथ खोतकर आणि सून रूपाली संदीप खोतकर यांची 'एक वर्षाच्या चांगल्या वर्तवणुकीच्या हमीवर' ५० हजारांच्या वैयक्तिक बंधपत्रावर मुक्तता केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT