Sambhajinagar news  Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar: धावत्या ट्रेनमधून पडून मुख्याध्यापिकेचा मृत्यू, भावाला राखी बांधून घराकडे जाताना भयंकर घडलं

Headmistress Dies After Falling From Moving: संभाजीनगरमध्ये भयंकर घटना घडली. धावत्या ट्रेनमधून पडून मुख्याध्यापिकेचा मृत्यू झाला. भावाच्या घरून परत जात असताना ही घटना घडली.

Priya More
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये धावत्या ट्रेनमधून पडून मुख्याध्यापिकेचा मृत्यू

  • जनशताब्दी एक्स्प्रेसमधून पडून मुख्याध्यापिका गंभीर जखमी

  • रुग्णालयात उपचारादरम्यान मुख्याध्यापिकेचा मृत्यू

  • भावाला राखी बांधून परतताना मुख्याध्यापिकेसोबत भयंकर घडलं

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये धावत्या ट्रेनमधून पडून मुख्याध्यापिकेचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये रक्षाबंधन साजरी करण्यासाठी त्या आल्या होत्या. भावाला राखी बांधून घराकडे परत जात असताना ही भयंकर घटना घडली. धावत्या ट्रेनमधून पडून त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये धावत्या जनशताब्दी एक्स्प्रेसमधून पडून गंभीर जखमी झालेल्या मुख्याध्यापिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुमनांजली गेणूजी बनसोडे असं या मुख्याध्यापिकेचे नाव होते. ट्रेनमधून पडून जखमी झालेल्या मुख्याध्यापिकेचा जीव वाचविण्यासाठी जनशताब्दी एक्स्प्रेस तब्बल दोन किलोमीटर मागे घेण्यात आली. मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.

नागरसोल ते तारूर रेल्वेस्थानकादरम्यान गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुमनांजली गेणूजी बनसोडे या मुंबईत भावाला राखी बांधून छत्रपती संभाजीनगरकडे परत येत होत्या. वॉशरूममधून बाहेर आल्यानंतर वॉशबेसिनमध्ये हात धूत असताना रेल्वेला अचानक जोराचा झटका बसला. त्यामुळे तोल जाऊन त्या धावत्या रेल्वेतून बाहेर फेकल्या गेल्या. प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढून रेल्वे थांबवली आणि जखमी महिलेच्या मदतीला धाव घेतली.

ट्रेन मॅनेजरने नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर जखमी मुख्याध्यापिकेला उपचार मिळावेत यासाठी रेल्वे दोन किलोमीटर मागे नेण्यात आली. त्यानंतर त्यांना रेल्वेतून छत्रपती संभाजीनगरकडे आणण्यात आले. पुढे घाटी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान गुरूवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुख्याध्यापिकेच्या कुटुंबीयांना धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा मऊ, खुसखुशीत आणि चविष्ट मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: रेल्वे पुलाला लटकून जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Morning Back Pain: झोपून उठल्यावर पाठदुखी होते? मग बदला झोपण्याची पद्धत; 'या' चुका टाळा

मशिदींवरील भोंग्यातून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला बापटांचा पाठिंबा? पाहा EXCLUSIVE मुलाखत|VIDEO

Bank Job: सरकारी बँकेत मिळवा नोकरी! 1100 पदांसाठी भरती, महिन्याला कमवा 93,000 रुपये

SCROLL FOR NEXT