Jayakwadi Dam Saam tv
महाराष्ट्र

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात अर्धा टक्के वाढ; पहिल्याच पावसाने धरणात पाणी दाखल

Sambhajinagar News : मागील वर्षी केवळ ४७ टक्केवर राहिलेला पाणीसाठा यंदाच्या उन्हाळ्यात साडेतीन टक्क्यावर आल्याने संपूर्ण मराठवाड्यावर जलसंकट निर्माण झालं होतं

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : पाण्याची भीषण टंचाई जाणवत असलेल्या मराठवाड्यात पाऊस झाला आहे. या पहिल्याच पावसामुळे छत्रपती संभाजीनगर शहरासह संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात अर्धा टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे पाण्याची चिंता मिटण्यास आता सुरवात झाली आहे. 

जायकवाडी धरण (Jayakwadi dam) क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने ही पाण्याची आवक वाढली आहे. दरम्यान मागील वर्षी केवळ ४७ टक्केवर राहिलेला पाणीसाठा यंदाच्या उन्हाळ्यात साडेतीन टक्क्यावर आल्याने संपूर्ण मराठवाड्यावर जलसंकट निर्माण झालं होतं. मात्र संभाजीनगरवर (Sambhajinagar) आपत्कालीन पाणी पुरवठा कपात करण्याची तयारी प्रशासन करत असताना धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा टक्का वाढल्याने आणि आवक सुरू झाल्याने आता दिलासा मिळाला आहे.

४ हजार ८३७ क्युसेक पाण्याची आवक

जायकवाडी धरण क्षेत्रात दोन दिवसांपासून (Rain) पाऊस होत आहे. यामुळे धरणात पाणी येण्यास सुरवात झाली आहे. धरणात पहिल्याच पावसात ४ हजार ८३७ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे संभाजीनगरला आता महिनाभर पुरेल एवढा साठा पहिल्याच पावसाने जायकवाडी धरणात दाखल झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोपीचंद पडळकरांना,डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात - चंद्रकांत पाटलांचा पडळकरांना मिश्किल टोला

बॉलीवूड अभिनेत्याला देश सोडून जायला सांगितलं; त्याने हायकोर्टात धाव घेतली|VIDEO

Car Neutral or First Gear: ट्रॅफिक सिग्नलवर कार न्यूट्रलमध्ये ठेवावी की गिअरमध्ये?

रेल्वे ट्रॅकजवळच्या झोपड्या हटवणार; 3500 लोकांना घरे रिकामी करण्याची नोटीस, कुठे होणार कारवाई? VIDEO

ट्रेनमध्ये प्रवासात मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यास वसूल करणार दंड, काय आहे नियम?

SCROLL FOR NEXT