sambhajinagar news Good news For Marathwada Farmers jayakwadi dam water level increased Saam TV
महाराष्ट्र

Jayakwadi Water Level: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस; जायकवाडीचा पाणीसाठा झपाट्याने वाढला, पाहा आजची आकडेवारी

Jayakwadi Dam Water Level: गोदावरी नदीला देखील महापूर आला असून मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे.

डॉ. माधव सावरगावे

Jayakwadi Dam Water Level Today

गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. गोदावरी नदीला देखील महापूर आला असून मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे संभाजीनगर आणि जालना शहरासाठी आणि जायकवाडी धरणावर अवलंबून असलेल्या गाव-शहरातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. (Latest Marathi News)

त्याचबरोबर उद्योगांसाठी लागणाऱ्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे. दुसरीकडे मराठवाड्यात देखील मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. तीन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने सहा जिल्ह्यांत दमदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या सहा जिल्ह्यांतील ५० मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.

तर छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील २० पैकी आठ मंडळांत ढगफुटीसदृश पाऊस झाला. आनंदाची बाब म्हणजे ८ मंडळांत १०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला. दरम्यान, संपूर्ण मराठवाड्यात अजूनही २४ टक्के पावसाची तूट कायम आहे. शिवाय खरीपातील सोयाबीन, मका, बाजरी, कापूस या मुख्य पिकासोबत इतर खरीपाची पीक शेतकऱ्यांच्या हातून पूर्णता गेल्याने हा पाऊस पडूनही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही.

केवळ पिण्याच्या पाण्याचं संकट सध्या टळलेलं आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणासह (Jayakwadi Dam) १२ मोठ्या प्रकल्पांत ४५.९६ टक्के उपयुक्त जलसाठा सध्या आहे. मागील वर्षी याच कालावधीत ११ प्रकल्पात ९५ टक्के पाणीसाठा होता. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून कुठे हलका तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने थोडासा आधार मिळत आहे.

मराठवाड्यातील धरणांमधील सध्याचा पाणीसाठा

  • जायकवाडी धरण: ३७.९७ पाणीसाठा

  • सिद्धेश्वर धरण: ६४.४२ पाणीसाठा

  • मांजरा धरण: २४.११ पाणीसाठा

  • विष्णुपुरी धरण: ९१.३५ पाणीसाठा

  • निम्न दुधना धरण: २५.५० पाणीसाठा

  • माजलगाव धरण: १२.१८ पाणीसाठा

  • सीना कोळेगाव धरण: ०० पाणीसाठा

  • मानार धरण: ६५.८३ पाणीसाठा

  • येलदरी धरण: ६१.४८ पाणीसाठा

  • पैनगंगा धरण: ७२.७६ पाणीसाठा

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गामुळे वारंवार पूर येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Maharashtra Politics: हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच खडसेंनी पत्रकार परिषदेतच महाजनांचा तो व्हिडिओ लावला | VIDEO

Congress Leader Dies : काँग्रेस नेत्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात हळहळ

Atal Setu : आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास, 'अटल सेतू'मुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

Digestion Tips: पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी नक्की करा 'हे' उपाय

SCROLL FOR NEXT