Police Recruitment Saam tv
महाराष्ट्र

Police Recruitment : मराठा आरक्षणासाठी पोलीस भरतीच्या नोंदणीला मुदत वाढ; १५ एप्रिलपर्यंत करता येतील अर्ज

Sambhajinagar News : राज्यात अनेक ठिकाणी रिक्त असलेल्या १७ हजार ४७१ जागेवर पोलीस भरती केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत आज संपुष्टात येणार होती.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : राज्यात होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी अद्याप ज्यांनी अर्ज केला नाही. त्यांच्यासाठी अर्ज करण्याची मुदत आता १५ दिवसांनी वाढविण्यात आली आहे. मराठा समाजाच्या युवकांनी आरक्षणाचा लाभ मिळावा व कागदपत्रे अपलोड करण्यात अडचणी येत असल्याने (Sambhajinagar) ही मुदत वाढ दिली असल्याने यामुळे दिलासा मिळणार आहे. (Live Marathi News)

राज्यात अनेक ठिकाणी रिक्त असलेल्या १७ हजार ४७१ जागेवर पोलीस भरती (Police Recruitment) केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत आज संपुष्टात येणार होती. मात्र, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांनी कागदपत्र अपलोड करण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याची निदर्शनास आणून दिले होते. शिवाय मराठा आरक्षण (Maratha Aarkshan) विधेयक संमत करण्यात आले असून नव्या आदेशानुसार सर्वच भरती प्रक्रियेत त्यांची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे उमेदवारांना एसईबीसी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांनी प्रशासनाला निवेदन देत या मुदतवाढीची मागणी केली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुदत वाढल्याने संधी

पोलीस (Police) भरतीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण यासाठी अर्ज दाखल करण्याची ३१ मार्च हि अंतिम मुदत होती. मात्र यासाठीची मुदत पंधरा दिवसांनी वाढविल्याने ज्यांचे अर्ज दाखल करण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या त्यांना हि चांगली संधी मिळाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

Dapoli : कड्यावर वसलेलं गणपतीचं सुंदर मंदिर, दृश्य पाहून व्हाल मंत्रमुग्ध!

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

SCROLL FOR NEXT