Sillod News Saam tv
महाराष्ट्र

Sillod News : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून कर्मचाऱ्याचा कार्यालयातच गळफास; सिल्लोड कृषी कार्यालयातील घटना

Sambhajinagar News : कार्यालयात अन्य कोणी कर्मचारी नसताना त्यांनी गळफास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. गळफास घेण्यापूर्वी त्यांनी मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आत्महत्या करण्याचे कारण यात सांगितले आहे

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहाय्यक असलेल्या कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने कृषी कार्यालयात खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी तालुका कृषी अधिकाऱ्यासह एका कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत  योगेश शिवराम सोनवणे असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान योगेश सोनवणे हे नेहमीप्रमाणे कार्यालयात गेले होते. कार्यालयात अन्य कोणी कर्मचारी नसताना त्यांनी गळफास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. गळफास घेण्यापूर्वी त्यांनी मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आत्महत्या करण्याचे कारण यात सांगितले आहे. 

व्हिडिओत घेतली वरिष्ठांची नावे 

योगेश सोनवणे यांनी केलेल्या व्हिडिओमध्ये कार्यालयात होणारा त्रास आणि आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची नावे त्यांनी स्पष्ट केली आहेत. तर योगेश सोनवणे यांना तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सहायक मानसिक त्रास देत होते. तसेच अपमानास्पद वागणूक देऊन सुटीच्या दिवशी अतिरिक्त काम लावले जात होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. 

दोन जणांवर गुन्हा दाखल 

दरम्यान घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. तर मृत योगेश सोनवणे यांच्या पत्नी विमल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरधे आणि कृषी सहायक किशोर बोराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

अचानक धनलाभ होईल, नोकरीत प्रमोशन मिळेल; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन होणार सुरू

कोकणात ठाकरेसेनेचा उमेदवार फोडला; महाराष्ट्राच्या राजकारणात माघारीचा पॅटर्न, कोणी कुठे घेतली माघार?

लाडकींना सरकारी लाभ सोडवेना; अपात्र लाडकींनी वळवला 'या' योजनांकडे मोर्चा

SCROLL FOR NEXT