Sambhajinagar News Love Afair Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : प्रेम प्रकरणातून चौदाव्या वर्षीच मुले सोडताहेत घर; ६ महिन्यांत १३४ मुले गेली पळून

प्रेम प्रकरणातून चौदाव्या वर्षीच मुले सोडताहेत घर; ६ महिन्यांत १३४ मुले गेली पळून

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

छत्रपती संभाजीनगर : प्रेमप्रकरणातून मुलामुलींचे घर सोडण्याचे प्रमाण आजघडीला वाढत आहे. धक्कादायक म्हणजे (Love Afair) प्रेमातून घर सोडण्याचे वय हे १४ व्या वर्षांपर्यंत खाली आहे आहे. यावर्षी सहा महिन्यातच तब्बल १३४ बालकांनी घर सोडल्याची (Sambhajinagar) धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे यात तब्बल ९५ मुली असल्याचे देखील अहवालातून समोर आले. (Latest Marathi News)

काबाडकष्ट करून वाढविणाऱ्या आई– वडीलांपेक्षा सध्या मुलामुलींना आभासी जगातील मित्र, मैत्रीणी, प्रियकर अधिक महत्त्वाचे वाटू लागले आहेत. यातच सर्वाधिक प्रमाण हे मुलींना पळवून नेण्याचे आहेत. त्यांना पळवून नेणारे मोठे असतात. परंतु कमी वयातील असमज, आकर्षक, वेब सिरीज, मोबाईल, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुलांमधील सहनशीलता संपत चालली आहे, असे निरिक्षण तज्ञांनी नोंदवले आहे. अशा प्रकारच्या तीन घटना मागील आठवड्यात घडल्याचे समोर आले.

मागील आठवड्यात तीन प्रकार

पहिल्या घटनेत संभाजीनगर शहरातील एका मुलीची सोशल मीडियावर भुवनेश्वर येथील मुलासोबत ओळख झाली. महिन्याभराच्या ओळखीवर तिने थेट भुवनेश्वर गाठले. दुसऱ्या घटनेत पंधरा वर्षीय मुलीने एकतर्फी प्रेमातून अहमदाबादहून थेट छत्रपती संभाजीनगर गाठले आणि पोलिसांना प्रियकर शोधून देण्याची मागणी केली. तिसऱ्या घटनेत १२ वर्षीय मुलीने इंस्टाग्रामवर झालेल्या प्रेमापोटी पुण्याहून थेट छत्रपती संभाजीनगरातील वाळूज गाठले.

साडेतीन वर्षात ५०१ मुलामुलींनी सोडले घर

मागील साडेतीन वर्षांमध्ये तब्बल ५०१ मुलामुलींनी घर सोडले. धक्कादायक बाब म्हणजे यात ८० टक्के मुली आहेत. २०२० साली ९७ मुलामुलींनी घर सोडले. २०२१ वर्षात ११२, २०२२ वर्षात १५८ तर २०२३ च्या जुन महिन्यापर्यंतच तब्बल १३४ मुलामुलींनी घर सोडले आहे. आजकाल बहुतांश आईवडील नोकरीत व्यस्त असतात. कुटुंबात संवाद साधण्यासाठी कोणीही नसल्याने अल्पवयीन मुली सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून निरनिराळ्या आमिषांना बळी पडतात. मित्रांकडून अथवा प्रियकराकडून ती पोकळी भरली जात असल्याचा त्यांना भास होतो. यातूनच घर सोडण्याच्या निर्णयापर्यंत त्या येऊन थांबतात.

या सर्व घटनांमध्ये मुलींचे घर सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यांना पालकांपेक्षा प्रियकर महत्त्वाचा वाटतो. यात आता हे प्रमाण १४ व्या वर्षांपर्यंत आल्याने आई वडिलांनी आपल्या मुलामुलींकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तसेच आई वडीलांनी आपल्या मुलामुलींसोबत संवेदनशील विषयावर खुलेपणाणे बोलले आणि घरात मोठ्या प्रमाणात संवाद झाला तर असे प्रकार टळू शकतील असे तज्ञ सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माहिममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर; ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

SCROLL FOR NEXT