Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News: बालविवाह केलेल्या मुलीचे अडीच महिन्यात टोकाचे पाऊल; पतीनेही महिनाभरापुर्वीच केली आत्महत्या

बालविवाह केलेल्या मुलीचे अडीच महिन्यात टोकाचे पाऊल; पतीनेही महिनाभरापुर्वीच केली आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडीया

छ्त्रपती संभाजीनगर : चौदाव्या वर्षी बालविवाह लावलेल्या मुलीसह तिच्या पतीने अडीच महिन्यातच वेगवेगळ्या कारणावरून (Sambhajinagar) जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिनाभरापूर्वी पतीने आत्महत्या केली होती. सोमवारी (१९ जून) रात्री पत्नीने गळफास घेतला. नारेगावमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको (Cidco) ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra News)

एमआयडीसी सिडको पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नारेगावातील आनंद गाडेनगरात राहणाऱ्या मुलीला लहान तीन भाऊ आहेत. तर तिचे आई-वडील वीटभट्टीवर काम करतात. अडीच महिन्यांपूर्वी तिच्‍या वडीलांनी एका तरुणासोबत मुलीचे लग्न लावून दिले. लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच पतीने आत्महत्या केली. पोलिसांना (Police) त्याचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.

घरात एकटी असताना टोकाचे पाऊल

दरम्यान अवघ्या १४ व्या वर्षी लग्न त्यानंतर दीड महिन्यात पतीची आत्महत्या. यामुळे तिच्‍यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यावर ती आई- वडिलांकडे राहू लागली. सोमवारी काम असल्याने आई-वडील बाहेर गेले होते. ते उशिरापर्यंत घरी आले नाहीत. या दरम्यान, मुलीने पत्र्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार तिच्या भावाच्या लक्षात आल्‍यानंतर त्यांनी दरवाजा तोडून तिला दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

बालविवाह समजला कसा नाही?

बाल कल्याण समिती, चाईल्ड हेल्प लाइन आणि पोलिसांच्या मदतीने शहर व जिल्ह्यात अनेक बालविवाह (Child Marriage) रोखले आहेत. मात्र, अडीच महिन्यापूर्वी लावण्यात आलेला विवाह यापैकी कोणत्याच यंत्रणेला समजला कसा नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. धक्कादायक म्हणजे, महिनाभरापूर्वी सदर मुलीच्या पतीने आत्महत्या केल्यानंतरही ही बाब समोर कशी आली नाही? हेही कोडेच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT