Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : संभाजीनगरात एमआयएम व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Sambhajinagar News : मतदान केंद्रांवर एमआयएम आणि भाजपच्या समर्थकांमध्ये मतदानाच्या दिवशी सायंकाळच्या वेळी राडा झाला होता

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या दिवशी काही ठिकाणी गोंधळ उडाला होता. संभाजीनगरमध्ये अशाच प्रकारे गोंधळ करत मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी एमआयएमचे इम्तियाज जलील व ठाकरे गटाचे राजू शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान झाले. या दिवशी (Sambhajinagar News) संभाजीनगरच्या शिवाजीनगर भागातील एका मतदान केंद्रावर इम्तियाज जलील यांच्यासह इतर १० ते १२ जणांनी बोगस मतदान होत असल्याचा आरोप करीत दमदाटी करून गोंधळ घातला होता. तसेच मारहाण केल्यावरून इम्तियाज जलील यांच्यासह समर्थकांवर पुंडलिकनगर पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा 
तसेच पंडित नेहरू महाविद्यालयातील मतदान केंद्रांवर एमआयएम आणि भाजपच्या समर्थकांमध्ये मतदानाच्या दिवशी सायंकाळच्या वेळी राडा झाला होता. तर वाळूजमधील बजाजनगरात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदेसह त्यांच्या ४० ते ५० कार्यकर्त्यांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राजू शिंदे यांनी ४०० ते ५०० कार्यकर्त्यांना जमवून मतदारांना अडथळा निर्माण केला होता असा आरोप आहे. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे आणि पथकाने रस्ता मोकळा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही गोंधळ घातला असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT