Kopargaon News : बसच्या सीटखाली विद्यार्थ्यांला सापडले नोटांचे बंडल; मतपेट्या आणलेल्या बसमध्ये रक्कम सापडल्याने खळबळ

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील हि घटना असून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एसटी बसमध्ये मोठी रक्कम मिळून आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे
Kopargaon News
Kopargaon NewsSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

कोपरगाव (अहिल्यानगर) : विधानसभा निवडणुकीच्या दिवशी ईव्हीएम मशीनची ने- आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस बुकिंग करण्यात आल्या होत्या. याच बसमध्ये सीटच्या खाली नोटांचे बंडल आढळून आले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव (Kopargaon News) येथील हि घटना असून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एसटी बसमध्ये मोठी रक्कम मिळून आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. कोपरगाव आगाराची बस असून दोन दिवसांपूर्वी हीच बस स्ट्रॉंग रूमपासून ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन गेली होती. त्यानंतर काल (St Bus) याच बसने कोपरगाव- वैजापूर- कोपरगाव अशा फेऱ्या मारल्या आहेत. दरम्यान काल सायंकाळी कोपरगावहून धामोरीकडे जात असताना विद्यार्थ्याला बसच्या शेवटच्या सीटखाली नोटांचे दोन बंडल सापडले आहेत. 

Kopargaon News
Chalisgaon News : निकालापूर्वी चाळीसगावात झळकले विजयाचे बॅनर; आमदार चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

एसटी बसच्या सीटखाली ५०० रुपयांच्या नोटांचे दोन बंडल सापडल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल ८६ हजारांची रोख रक्कम सापडल्याने खळबळ एवढी मोठी रक्कम नेमकी कुणाची आणि बसच्या सीटखाली कशी आली? याबाबत पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे. मात्र प्रामाणिकपणा दाखवत विद्यार्थ्यांनी वाहकाकडे सुपूर्द केले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com