Leopard  Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; अखेर वन विभागाकडून बिबट्या जेरबंद

Sambhajinagar News : संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील भांबरवाडी परिसरात दोन दिवसापूर्वी बिबट्याने ऋषिकेश राठोड या १५ मुलावर हल्ला करून त्याचा जीव घेतला होता

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : बिबट्याने हल्ला करत एका १४ वर्षीय मुलाला ठार केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु असताना अखेर आज बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला आहे. 

संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील भांबरवाडी परिसरात दोन दिवसापूर्वी बिबट्याने ऋषिकेश राठोड या १५ मुलावर हल्ला करून त्याचा जीव घेतला होता. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभागाने भांबरवाडी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याचा (Leopard) शोध घेऊन त्याला अखेर जेरबंद केले आहे. यामुळे ग्रामस्थ नागरिकांसह आसपासच्या गावातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. जेरबंद केलेल्या बिबट्याला वन विभागाकडून (forest department) नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे. 

मृत मुलाच्या कुटुंबाला २४ लाखाची मदत

दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या ऋषिकेश राठोड या मुलाच्या कुटुंबाला खासदार संदिपान भुमरे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन करून तात्काळ २५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात मिळवून दीली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग' मालिकेत होणार मोठा खुलासा; सुमनने करणार महिपत-नागराजची पोलखोल, पण…

Maharashtra Live News Update: साई चरणी 20 लाख रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट अर्पण

Dink Ladoo: साजूक तूपातला डिंकाचा लाडू कसा बनवायचा?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Parliament Winter Session: लोकसभेत गोंधळात 'G Ram G' विधेयक मंजूर, विरोधकांनी फाडल्या विधेयकाच्या प्रती

SCROLL FOR NEXT