Leopard
LeopardSaam tv

Leopard Death : विजेच्या धक्क्याने बिबट्याचा मृत्यू; तळोदा तालुक्यातील घटना

Nandurbar News : तीन वर्षे वयाचा बिबट्या असून अमृत बिबट्याचे दात आणि मिशा सर्व सुरक्षित आढळून आले आहेत. चारही पायांचे नख पंजे आणि कातडी सुरक्षित आहे
Published on

सागर निकवाडे 

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील धनपूर नियत क्षेत्रात असलेल्या एका शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला असल्याची प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. 

Leopard
Pomegranate Crop : वातावरण बदलाचा डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव

नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील वन क्षेत्रात वन्य प्राण्याचा अधिवास आहे. यात बिबट्याचा देखील अधिवास असून शेतशिवारात फिरत असताना विद्युत तारेला स्पर्श होऊन विजेच्या धक्क्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. विजेच्या धक्क्याने (Leopard) बिबट्याचा पाय भाजलेल्या अवस्थेत असून वीज प्रवाहाचा तारेला स्पर्श झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती वन विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

Leopard
Contaminated Water : दूषित पाण्यामुळे १३० जणांना बाधा; आरोग्य पथक तळ ठोकून

वन विभागाकडून पंचनामा 

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. यात तीन वर्षे वयाचा बिबट्या असून अमृत बिबट्याचे दात आणि मिशा सर्व सुरक्षित आढळून आले आहेत. चारही पायांचे नख पंजे आणि कातडी सुरक्षित आहे. मात्र बिबट्याचा पाय भाजलेला दिसून आला. यामुळे बिबट्याची शिकार नसून विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com