Sambhajinagar News Saam Digital
महाराष्ट्र

Sambhaji nagar : बँका बुडाल्या, ठेवीदार महिला भडकल्या; पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या

Sambhajinagar Bank News : बुडालेल्या बँकांमधील ठेवी परत मिळाव्या यासाठी संभाजीनगरमध्ये ठेवीदारांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. यावेळी ठेवीदार आक्रमक झाले होते.

Sandeep Gawade

Sambhajinagar News

बुडालेल्या बँकांमधील ठेवी परत मिळाव्या यासाठी संभाजीनगरमध्ये ठेवीदार महिलांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. यावेळी ठेवीदार आक्रमक झाले होते. कार्यालयांच्या गेटवर चढून आत जाण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी इम्तियाज जलील आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक आणि झटापट झाली. दरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी ठेवीदार आंदोलकांच्या पायावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याची माहिती आहे.

आयुक्त कार्यालयात झालेल्या गोंधळामुळे पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली असून आयुक्त कार्यालायाला छावणीचं स्वरूप आलं आहे. अग्निशामक दल आणि दंगल नियंत्रण पथक देखील आंदोलनस्थळी दाखल झालं आहे. संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्था , ज्ञानोबा अर्बन सोसायटी , मलकापूर बँक अशा तीन ते चार बँका आणि पतसंस्थामध्ये ठेवीदारांचे पैसे अडकले आहे ते पैसे परत मिळावे या मागणीसाठी संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आज शेकडोच्या संख्येने ठेवीदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आक्रमक झालेल्या ठेवीदारांनी विभागीय आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला गेटवरण चढून जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवलं या ठेवीदाराचे नेतृत्व एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील करत होते,

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जुलै २०२३ मध्ये आदर्श बँकेत मोठा घोटाळा झाला होता. व्यवहारांमध्ये तब्बल २०० कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. बँकेच्या संचालक मंडळाने वेगवेगळ्या संस्थांच्या नावे कर्ज काढून बँकेचं २०० कोटींचं नुकसान केल्याची तक्रार झाल्यानंतर बँकेच्या अध्यक्षांसह एकूण ५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र ठेवीदारांच्या पैशाचं काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला होता.

बँक घोटाळा समोर आल्यानंतर पैसे परत मिळवून देण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पैसे परत मिळतील असं आश्वासनही देण्यात आलं होतं. मात्र अद्याप सरकारकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आज ठेवीदारांनी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढून संताप व्यक्त केला. मआयएमचे खासदार इम्तियाज जलील देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. विभागीय आयुक्त चर्चेसाठी आले असते तर गोंधळ झाला नसता, असं त्यांनी म्हटलं आहे.

आम्ही गुन्हेगार नाही, आतंकवादी नाही, मग पोलीस बाळाचा वापर का करताय असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. जोपर्यंत पैसे मिळण्याचे किमान आश्वासन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय सोडणार नाही अशा पद्धतीचा पवित्रा त्यांनी घेतलाय.. पुढील काही वेळात विभागीय आयुक्त जर बाहेर आले नाही तर लाठ्या घाला किंवा गोळी घाला मात्र आम्ही हटणार नाही असा इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे. सर्वसामान्य ठेवीदार मात्र आमचे पैसे मिळायला हवे इतकीच आमची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT