Sambhajinagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime : गाडीच्या मदतीने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत समोर

Sambhajinagar News : पहाटे तीन वाजेच्या सुमारास शहरातील सुमसाम असलेल्या रस्त्यावरील एटीएमवर चोरटयांनी निशाणा साधला होता. यासाठी गाडी व जाड दोरखंडाच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयन्त करण्यात आला आहे. 

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : एटीएम मधील रक्कम लांबविल्याच्या घटना तसेच थेट गाडीच्या सहाय्याने मशील बांधून चोरी करण्याचे प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील शहानूरवाडी दर्गा परिसरात घडला आहे. यात एसबीआय बँकेच्या शाखेतील एटीएम मशीन चोरट्यांनी थार गाडीच्या मदतीने ओढून फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा हा प्रयत्न फसला असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरातील शहानूरवाडी दर्गा परिसरात रात्रीच्या सुमारास हि घटना घडली आहे. दरम्यान सकाळी हा प्रकार लक्षात आला असून एसबीआयच्या शहानूरवाडी शाखेत मॅनेजर विशाल हरिदास इंदूरकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात ४ ऑगस्टच्या पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान चार अज्ञात इसमांनी हा प्रयत्न केला असल्याचे निदर्शनास आले आहे. 

एटीएमचा पत्रा उचकवण्याचा प्रयत्न 

दरम्यान कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या एटीएम च्या बाहेर चोरट्यानी गाडी उभी केली. यानंतर त्यांनी बँकेच्या एटीएम मशीनला थार गाडीला बांधून ओढण्याचा प्रयत्न केला. तसेच स्क्रू ड्रायव्हरने एटीएमचे कव्हर उचकटण्याचा प्रयत्न करत केबिनमधील सीसीटीव्ही कॅमेरे देखील फोडण्यात आले आहेत. परंतु चोरट्यांना हे शक्य न झाल्यामुळे त्यांनी तेथून ताबडतोब पळ काढला. 

सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कैद 

या घटनेत एटीएम मशीन आणि  केबिनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान करण्यात आले. सदरचा प्रकार बँकेच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. या प्रकरणी चार अज्ञात आरोपींविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Happy Ganesh Chaturthi 2025 Wishes : गणपती बाप्पा मोरया! गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा या खास शुभेच्छा

Crime News: पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नीचा उपवास; अंडा करीसाठी नकार देताच नवऱ्याची मती खुंटली, अन्...

BCCI चं १२५ कोटी रुपयांचं नुकसान; Dream ११ नंतर आणखी एका कंपनीने साथ सोडली?

Gautam Gaikwad: सिंहगडावरून तरुण बेपत्ता कसा झाला? ५ दिवसांत काय-काय घडलं, गौतम गायकवाडने सांगितला थरारक किस्सा

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का, बड्या नेत्याचा राजीनामा; शिंदे गटात जाणार

SCROLL FOR NEXT