Corona Positive Saam tv
महाराष्ट्र

Corona Positive : सावधान कोरोना परतला; संभाजीनगरात ७ रुग्ण बाधित, महापालिका सतर्क

Sambhajinagar News : जगभरात कोरोना महामारीने प्रचंड हाहाकार माजविला होता. देशासह राज्यात देखील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : दोन वर्षांपूर्वी देशातच नव्हे तर जगभरात कोरोना महामारी पसरली होती. या महामारीत अनेकांचा जीव गेला होता. या महामारीवर नियंत्रण मिळाले होते. दरम्यान हा कोरोना पुन्हा एकदा परतला असून संभाजीनगर शहरात कोरोनाची लक्षण आढळून आलेल्या रुग्णांची तपासमी केली असता ७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झाली आहे. 

जगभरात कोरोना (Corona) महामारीने प्रचंड हाहाकार माजविला होता. देशासह राज्यात देखील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. यानंतर कोरोना नियंत्रणासाठी लस घेण्यात आली होती. यामुळे कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाले होते. तरी देखील काही ठिकाणी एक- दोन कोरोना बाधित आढळून आले होते. मात्र सुरवातीच्या कोरोना लाटेत असलेली तीव्रता नसल्याने रुग्ण लवकर बरे होत आहेत. अशातच (Sambhajinagar) संभाजीनगरमध्ये आता कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 

छत्रपती संभाजीनगर शहरात भावसिंगपुरा भीम नगर आणि इतर ठिकाणी कोरोना संशयित १७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात ७ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ९ झाली असून महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. बाधित रुग्णांना होम इसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करावे; असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

Gram Panchayat Elections: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT