Water Shortage Saam tv
महाराष्ट्र

Water Shortage : संभाजीनगर शहरातच टँकरच्या फेऱ्या ४५० पार; महापालिकेच्या नो नेटवर्क भागात टँकरची मागणी वाढली

Sambhaijnagar News : यंदा कमी पावसामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागासह आता शहरी भागात देखील पाणी टंचाईची झळ बसायला सुरवात झाली आहे.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर  : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उन्हाच्या तडाख्याने सर्वत्रच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याच्या टंचाईमुळे शहरातील नागरिकांना देखील आता पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान संभाजीनगर शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर्सच्या फेऱ्या आता ४५० च्या वर गेले आहेत. 

यंदा कमी पावसामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागासह आता शहरी भागात देखील पाणी टंचाईची झळ बसायला सुरवात झाली आहे. या दरम्यान संभाजीनगर शहरातील एन ५, चिस्तीया चौक, रोकडा हनुमान कॉलनीसह नक्षत्रवाडी येथून दररोज ८५ टँकर भरले जात होते. आता त्याच टँकरची संख्या १०० पेक्षा अधिक झाल्याने शहरातील नो नेटवर्क परिसरात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकरच्या फेऱ्यात ४०० हून अधिक वाढ झाल्याने शहरातील जलसंकट गहिरे होत चालले आहे. 

जिल्ह्यातही भीषण टंचाई 

संभाजीनगर जिल्ह्यातील टंचाईची परिस्थिती बिकट होत चालली असल्याने आचारसंहितेची झळ टंचाई निवारणाच्या कामांना आणि टँकर पूरवठ्यावर होऊ नये असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहे. तर जिल्हा परिषद प्रशासनाकडून ३८० गावे आणि ५७ वाड्यांमध्ये जवळपास ६०९ टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असून २७० विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. दरम्यान जायकवाडी धरणात केवळ ७ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने या महिन्यात टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

SCROLL FOR NEXT