Jalgaon Accident : भीषण अपघात; कारच्या धडकेत आईसह दोन मुले व भाच्याचा मृत्यू

Jalgaon News : अपघाताची माहिती मिळताच रामदेववाडी ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. याठिकाणी ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला
Jalgaon Accident
Jalgaon AccidentSaam tv

जळगाव : जळगाव शहरापासून जवळ असलेल्या रामदेववाडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात (Jalgaon) आईसह दोन मुलं व एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा (Accident) अपघात झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

Jalgaon Accident
Hingoli Water Crisis : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बनला गंभीर; हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणात पाण्याचा मृतसाठा

जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथील राणी सरदार चव्हाण (वय ३०), सोहन चव्हाण (वय ७) व सोमेश सरदार चव्हाण (वय २), यांचा जागीच मृत्यू झाला. तर राणी चव्हाण यांचा भाचा लक्ष्मण भास्कर राठोड (वय १२) हा अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला. 

Jalgaon Accident
Soyabean Price : सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; शेतकरी हवालदिल

गावाबाहेर येताच मृत्यूने गाठले 

राणी चव्हाण या सोहन व सोमेश आणि लक्ष्मण राठोड यांच्यासह जळगावला कामानिमित्त निघाल्या होत्या. गावाच्या बाहेर आल्यावर समोरून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तिन्ही मुले एका बाजूला फेकल्या गेले. त्यात राणी चव्हाण, सोहम व सोमेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी लक्ष्मणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

नागरिकांचा रास्ता रोको
अपघाताची माहिती मिळताच रामदेववाडी ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. याठिकाणी ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव संतप्त झाला. संतप्त जमावाने दगडफेक सुरू केली. यानंतर पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकाच्या दोन प्लाटून बोलावल्या. त्यानंतर काही वेळाने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणली. दगडफेकीत दंगा नियंत्रण पथकाचे उमेश गायकवाड (वय ३०) आणि एक महिला पोलिस जखमी झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com