Sambhajinagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime : गाय अंगावर धावून आल्याने तरुणाला मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

Sambhajinagar News : ओंकार जाधव हा तरुण आपल्या गायीला पाणी पाजण्यासाठी शेतात घेऊन जात होता. त्यावेळी रस्त्यात उभ्या असलेल्या वीरू पवार याच्या अंगावर गाय धावून गेली

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : गायींना चरायला घेऊन जाताना गाय अंगावर धावून आली. याचा राग आल्याने गे चरणाऱ्या तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण केली. यात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना  छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या एकलहेरा गावात घडली. 

संभाजीनगर (sambhajinagar) शहरालगत असलेल्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील एकलहेरा या गावात हि धक्कादायक घटना घडली असून या ओंकार उत्तम जाधव (वय १९) याचा मृत्यू झाला आहे. ओंकार जाधव हा तरुण आपल्या गायीला पाणी पाजण्यासाठी शेतात घेऊन जात होता. त्यावेळी रस्त्यात उभ्या असलेल्या वीरू पवार याच्या अंगावर गाय धावून गेली. 

संशयिताला अटक 

गाय अंगावर धावली म्हणून चिडलेल्या तरुणाने गायीसह गाय चारणाऱ्या तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण (Crime News) केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरू असतांना त्याचा आज मृत्यू झाला. या प्रकरणी संशयित आरोपी विरू पवारला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास वाळूज एमआयडीसी (Police) पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पथरीकर करीत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात मोठा विस्तार, ३५ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

SCROLL FOR NEXT