Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar : आईसाठी दागिने बनविण्यापूर्वीच अनर्थ; भरदिवसा गाडीची डिकी तोडून पावणेतीन लाख लंपास

Sambhajinagar News : पार्किंगमध्ये मोपेड गाडी लावलेल्या ठिकाणी एकजण फोनवर बोलत चकरा मारत होता. यात संधी मिळताच त्याने गाडीची डिक्कीचा लॉक तोडला. यानंतर यात २ लाख ८५ हजार रुपयांची असलेली रक्कम घेऊन चोरटा पसार

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने- चांदी खरेदी केले जात असते. त्यानुसार या मुहूर्तावर आईसाठी दागिने बनविण्याचे स्वप्न होते. त्यानुसार दागिने खरेदी करण्यासाठी व्यावसायिक असलेला मुलगा रक्कम घेऊन मार्केटमध्ये गेला होता. मात्र गाडी पार्किंगमध्ये लावली असताना एकाने गाडीची डिक्की तोडून यात ठेवलेली २ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना समोर आली आहे. 

छत्रपती संभाजी नगर शहरातल्या क्रांती चौक- उस्मानपुरा रस्त्यावरील एका शोरूम बाहेर भर दिवसा घडलेल्या या धाडसी चोरीमुळे शहराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दसऱ्याच्या दिवशी मार्केटमध्ये वर्दळ होती. तर याच दिवशी आईसाठी दागिने खरेदी करण्यासाठी व्यावसायिक कपिल खंडागळे हे रक्कम गाडीच्या डिक्कीत ठेवून मार्केटमध्ये गेले होते. त्यानिशी पार्किंगमध्ये गाडी पार्क केली होती. 

डिक्कीचा लॉक तोडून रक्कम लांबविली 

पार्किंगमध्ये मोपेड गाडी लावलेल्या ठिकाणी एकजण फोनवर बोलत चकरा मारत होता. यात संधी मिळताच त्याने गाडीची डिक्कीचा लॉक तोडला. यानंतर यात २ लाख ८५ हजार रुपयांची असलेली रक्कम घेऊन चोरटा पसार झाला आहे. काही वेळाने व्यापारी कपिल आला असता त्याला गाडीची डिक्की उघडी असल्याचे दिसून आले. डिक्कीत पहिले असता रक्कम ठेवलेली पिशवी गायब झाल्याचे दिसून आले. 

घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

दरम्यान हा सर्व प्रकार शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यानंतर कपिल खंडागळे यांच्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सणासुदीच्या काळात झालेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism: थंड हवा अन् निसर्गाच्या कुशीत वनडे ट्रीप, पुण्यापासून फक्त 50 किमीवर TOP 5 Hidden स्पॉट्स, वाचा

Dharashiv Rain : धाराशिवमध्ये महापुराचा आणखी एक बळी; ओढ्याच्या पुरात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू

Maharashtra Live News Update: मी संशय व्यक्त केला, चौकशीची मागणी करणं चूक नाही - रामदास कदम

Blouse Fitting Secret: ब्लाउज सैल होतोय पण टेलरकडे जायला वेळ नाही? मग, या टिप्स वापरुन लगेच करा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह

Sangli News : ...तर सहकारमंत्र्यांच्या दारात उपोषण करेल, महायुतीच्या आमदाराचा घरचा आहेर

SCROLL FOR NEXT