Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : गॅस कटरने एटीएम फोडून ९ लाख लंपास; संभाजीनगर शहरातील रात्रीची घटना

Sambhajinagar News : महाविद्यालयीन परिसर असल्याने या भागात वर्षी वर्दळ नसते. याचा फायदा घेत चोरट्यांनी एटीएम फोडून यातील रक्कम लांबविली आहे.

माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी हा प्रकार केला असून एटीएम मधून तब्बल ९ लाखाच्या जवळपास रक्कम काढून नेली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar News) शहरातील विवेकानंद कॉलेज गेटच्या जवळ एसबीआय बँकेचे एटीएम आहे. थंडी अधिक जाणवत असल्याने रात्रीच्या वेळी आता फारशे कोणी निघत नाही. यात महाविद्यालयीन परिसर असल्याने या भागात वर्षी वर्दळ नसते. याचा फायदा घेत चोरट्यांनी एटीएम (ATM) फोडून यातील रक्कम लांबविली आहे. हा प्रकार सकाळी लक्षात आल्याने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली होती. 

गॅस कटरने फोडले एटीएम 

दरम्यान १ डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी एटीएमच्या कक्षात प्रवेश केला. यानंतर चोरट्याने गॅस कटरचा वापर करत एटीएमचा पत्रा कापून व जाळून आतील ८ लाख ८९ हजार ३०० रुपयांची रोकड लंपास केली. दरम्यान एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी आलेल्या एजन्सीच्या प्रतिनिधींना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याने हि माहिती पोलिसांना कळविली. यानंतर पोलीस दाखल झाले. 

हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन 

दरम्यान ज्या ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रकार घडला त्यापासून क्रांतीचौक पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यानी ८ लाख ८९ हजाराची रोकड लांबवली. हा संपूर्ण प्रकार घडेपर्यंत तोपर्यंत क्रांती चौक पोलीस साखर झोपेत होते हे विशेष. कॅश भरण्यासाठी आलेल्या एजन्सीच्या प्रतिनिधींनी या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांना याची माहिती झाली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Ahilyanagar : जातीची बंधने झुगारत अंध शिवाजी आणि आशाने बांधली लग्नगाठ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून अनोखा रिसेप्शन सोहळा

Nilesh Sable: 'डॉक्टर ते ॲक्टर' निलेश साबळेविषयी या गोष्टी कोणालाच माहित नाही

Beed: सामाजिक कार्यकर्त्याचा प्रताप; जिल्हा परिषदेच्या कार्यालयात गेला, महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करत...

SCROLL FOR NEXT