Tragic Xerox Shop Owner Suicide In Nalasopara East Ambawadi Case Under Investigation Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : संभाजीनगर हादरलं! भररस्त्यात चाकूने सपासप वार करत पोटच्या मुलाकडून वडिलांची हत्या; बहीण गंभीर

Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरात मालमत्तेच्या वादातून धक्कादायक घटना घडली. न्यायालयाचा निकाल वडिलांच्या बाजूने लागताच मुलाने ८२ वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याची चाकूने हत्या केली. पोलीस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक घटना

  • पोटच्या मुलाने भररस्त्यात वडिलांची केली हत्या

  • मालमत्तेच्या वादातून हत्या केल्याचे उघडं

  • पोलिसांकडून आरोपीला बेड्या

प्रत्येक मुलाच्या आयुष्यात 'बाप' नावाचा आधारवड हा लागतोच. वडील मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. मात्र याचं वडिलांच्या म्हतारपणात मुलं त्यांचा सांभाळ करताना टाळाटाळ करतात. अशीच एक संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील सिल्कमील कॉलनीमध्ये घडली आहे. निवृत्त झालेल्या वडिलांच्या संपत्तीवर हक्क सांगून पोटच्या निर्दयी मुलाने त्यांची भररस्त्यात निर्घृण हत्या केली असल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत मृत व्यक्तीची मुलगी, म्हणजेच आरोपीची बहीण, गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जाफर कमरुद्दीन सय्यद पटेल (वय ८२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते जलसंपदा विभागातून निवृत्त अधिकारी होते. आरोपीचे नाव अब्दुल रहेमान अब्दुल जाफर असे असून मृत पटेल यांचा नात्याने मुलगा लागतो. जाफर पटेल आणि त्यांच्या मुलामध्ये घराच्या मालकी हक्कावरून दीर्घकाळ वाद सुरू होता. या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू होता. गुरुवारी न्यायालयाने निकाल जाफर पटेल यांच्या बाजूने दिला. निकालानंतर त्यांनी घराचा अधिकृत ताबा घेतला आणि मुलीसोबत रिक्षाने आनंदाने घरी येत होते.

दरम्यान, सिल्कमील कॉलनी परिसरात आरोपी अब्दुल रहेमान याने त्यांची रिक्षा अडवली. संतापाच्या भरात त्याने रिक्षातच वडील आणि बहिणीवर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात जाफर पटेल यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळली. स्थानिकांच्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल रहेमान हा हिंसक स्वभावाचा होता. तो वारंवार आई-वडिलांशी वाद घालत असल्याचे तसेच त्यांना मारहाण करत असल्याचे सांगितले जाते. त्याच्या पहिल्या पत्नीनेही त्याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून जाफर पटेल यांनी काही वर्षांपूर्वी पुण्यात राहणाऱ्या मुलीकडे राहायला पसंत केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. भरदिवसा गजबजलेल्या रस्त्यावर घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरक्षणाचे संरक्षण व्हावं, शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं : सलीम सारंग

साकीनाका दुर्घटना प्रकरण; मुंबईकर जीवानं गेला, आमदार म्हणतात कट केला

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT