Sambhajinagar Corporation Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Corporation : कर भरणाऱ्यांनाच आता मनपा देणार कंत्राट; महापालिका प्रशासकांचा निर्णय, सादर करावे लागेल एनओसी

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिकेला दरवर्षी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयश येत असल्यास चित्र आहे. परंतु यंदा कर भरणाऱ्यांनाच कंत्राट देण्याचा निर्णय महापालिका प्रशासकांनी घेतला आहे. अर्थ कर न भरणाऱ्या ठेकेदारांना हे कंत्राट दिले जाणार नाही. 

संभाजीनगर (Sambhajinagar) महापालिकेकडून यंदा कर वसुलीसाठी पालिका प्रशासनाने एक विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यासोबतच मालमत्ता कर आणि पाणी पट्टी थकविणाऱ्याना महापालिका आता विविध कामांचे कंत्राट देणार नसल्याचा निर्णय प्रशासक जी श्रीकांत यांनी घेतला. अर्थात महापालिकेची कर वसुली अधिक व्हावी यासाठी पालिका प्रशासकांनी हा निर्णय घेतला आहे. 

महापालिका निवडणुकीत विजय झाल्यानंतर प्रत्येक नगरसेवक हे आपापल्या वार्डातील विकास कामांचे कंत्राट स्वतःच्या मर्जीतील ठेकेदाराला मिळवून देत होते. शिवाय मागील काही वर्षांपासून नगरसेवकच कंत्राटदार बनल्याचे चित्र मनपात दिसून आले. त्यामुळे जर कर थकलेला असेल, तर अशा ठेकेदारांना आता मनपाकडून कंत्राट मिळणार नाही; असा इशाराच प्रशासकांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या मर्जीतील ठेकेदारांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अखेर अक्षय शिंदेचा शांतीनगर स्मशानभूमीत दफनविधी संपन्न

Sambhajinagar News : मद्यधुंद कार चालकाची तीन कारला धडक; पाचजण झाले फरार, संभाजीनगरातील घटना

Pankaja Munde Blackmail : पंकजा मुंडे यांना 2019 मध्ये तिकिटासाठी ब्लॅकमेल करण्यात आलं, भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

Manoj Jarange : ठाकरे, मुंडे, शिंदेंनतर आता मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा; नारायण गडावरुन रणशिंग फुंकणा

IND vs BAN: शुभमन गिल, रिषभ पंत अन् युजवेंद्र चहलला टी-२० संघात स्थान का नाही मिळालं? हे आहे कारण

SCROLL FOR NEXT