Sambhajinagar Corporation Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Corporation : प्रारूप विकास आराखड्यावर ८ हजार ५०० आक्षेप; सुनावणीसाठी चार अधिकाऱ्यांची समिती

Sambhajinagar News : छत्रपती संभाजी नगर शहराचा प्रारूप विकास आराखडा ३३ वर्षानंतर ७ मार्चला प्रसिद्ध करण्यात आला होता.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर शहरासाठी नव्याने प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा तयार झाल्यानंतर यावर काही आक्षेप असल्यास तो नोंदविण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. त्यानुसार आराखड्यावर ८ हजार ५०० आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. (Sambhajinagar) घाईगडबडीने तयार केलेल्या या आराखड्यात अनेक भागावर चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकण्यात आल्याने हा गोंधळ उडाला आहे. 

छत्रपती संभाजी नगर शहराचा प्रारूप विकास आराखडा ३३ वर्षानंतर ७ मार्चला प्रसिद्ध करण्यात आला होता. महापालिकेकडून केवळ ३ महिन्यातच घाई गडबडीत शहराचा नवा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. त्यात असंख्य आणि गंभीर चुका झाल्याचे निदर्शनास येत (development Plan) आहे. त्यानंतर नागरिकांना सूचना, हरकती घेण्यासाठी ६० दिवसांचा अवधी महापालिकेकडून देण्यात आला होता. 

४ अधिकाऱ्यांची समिती 

महापालिकेने दिलेल्या ६० दोवसांच्या मुदतीत ६ मे हा आक्षेप नोंदवण्याचा शेवटचा दिवस असल्याने नागरिकांनी रांगा लावून जवळपास ८ हजार ५०० आक्षेप दाखल केले आहेत. दरम्यान या आक्षेपांची छाननी मनपाकडून केली जाईल. त्यानंतर राज्य शासनाने नियुक्त केलेल्या ४ अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत यावर सुनावणी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : किसान सभेच्या मोर्च्याला स्थगिती

Trending Mangalsutra Designs: महिलांना आवडणाऱ्या मंगळसूत्राच्या ट्रेडिंग्स 5 डिझाईन्स

PM Kisan Yojana: 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत ₹२०००, पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

Kolhapur Tourism: खरंच लोणावळा-खंडाळा विसराल; कोल्हापूरपासून फक्त २१ किमी लांब आहे हे हिल स्टेशन

Shocking : ४ तरुण अन् ४ तरुणी एकाच खोलीत नको त्या अवस्थेत; पोलिसांनी धाड टाकताच धक्कादायक प्रकार उघड

SCROLL FOR NEXT