Engineering student Tejal Pradhan died after a speeding container hit her bike near Gangapur highway. Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Sambhajinagar Accident : हळदीला जाताना काळाचा घाला; कंटेनरच्या धडकेत इंजिनिअरिंग विद्यार्थिनीचा मृत्यू

Engineering student accident : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात हळदीच्या कार्यक्रमाला जात असताना कंटेनरच्या धडकेत १७ वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनी तेजल प्रधान हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

Sambhajinagar Road Accident News : नातेवाईकाच्या हळदीला निघालेल्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा कंटेनरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिचे वडील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील ढोरेगाव येथे घडली. तेजल काकासाहेब प्रधान (वय १७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती छत्रपती संभाजीनगर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. या अपघातात तिचे वडील काकासाहेब गिरजाबा प्रधान (वय ४६) गंभीर जखमी झाले आहेत.

आंबेलोहोळ येथील रहिवासी असलेले काकासाहेब प्रधान मुलगी तेजलसह दुचाकीवरून बगडी येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. शुक्रवारी दुपारी ढोरेगाव शिवारातील शिवना नदीच्या पुलाजवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघेही रस्त्यावर फेकले गेले.

स्थानिकांनी तातडीने दोघांनाही गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तेजलला मृत घोषित केले. गंभीर जखमी काकासाहेब यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

तेजल ही अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. तिने जिल्हा परिषद शाळेतून दहावीची परीक्षा ९४% गुणांसह उत्तीर्ण केली होती. सध्या ती शासकीय तंत्रनिकेतन, छत्रपती संभाजीनगर येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकत होती. गुरुवारीच तिचा प्रथम वर्षाचा शेवटचा पेपर झाला होता. परीक्षेचा आनंद घेऊन घरी परतलेल्या तेजलवर दुसऱ्याच दिवशी काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोरामणी तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला बांगलादेश सीमेवर सोलापूर पोलिसांनी पकडलं

TVK चा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा; थलापती विजय होणार तामिळनाडूचे मुख्यमंत्री, सूवेंदू होणार बंगालचे अधिकारी

Accident : साताऱ्यात काळाचा घाला! आयशर ट्रक खोल दरीत कोसळला; लहान मुलासह ४ जणांचा मृत्यू

Saturday Horoscope : मनातील इच्छा पूर्ण होतील, खर्चाचं टेन्शन वाढेल; ५ राशींच्या लोकांची धनाने झोळी भरणार

KKR चा सलग चौथा विजय; दिल्ली कॅपिटल्सला घरच्या मैदानावर चारली धूळ

SCROLL FOR NEXT