सोलापुर : सोलापूर की खड्डेपूर अशा घोषणा देत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज (बुधवार) साेलापूर (Solapur) शहरातील खड्डे (potholes) बुजवावेत अशी मागणी केली. यावेळी आंदाेलनकर्त्यांनी लाेकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळं रस्त्यांवरील अपघात वाढलेत असेही नमूद केले. (Solapur Latest Marathi News)
सोलापूर शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर पावसामुळे भले मोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे शहरामध्ये अपघाताच प्रमाण ही मोठ्या संख्येने वाढलं आहे. रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे.
त्यामुळे संभाजी ब्रिगेडने निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या विरोधात 'चाळणी आंदोलन' करत सोलापूर महापालिकेचा निषेध केला आहे. यावेळी सोलापूर की खड्डेपूर अशा घोषणा ही संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. महापालिकेने तातडीनं खड्डे बुजवावेत अन्यथा तीव्र आंदाेलन छेडलं जाईल असे श्याम कदम (शहराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड) यांनी इशारा दिला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.