Sambhaji Bhide Controversial Statement saam tv
महाराष्ट्र

Sambhaji Bhide : दांडियामुळे हिंदू समाज गां*** बनत चाललाय; संभाजी भिडे पुन्हा बरळले

Sambhaji Bhide Shocking Statment in Dandiya : नवरात्रीच्या उत्सवाबाबत बोलताना भिडे यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे.

Satish Daud

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असता. अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्यावर मोठी टीकेची झोड उठते. काही महिन्यांपूर्वी भिडे यांनी महिलांच्या कपड्यांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं.आता नवरात्रीच्या उत्सवाबाबत बोलताना भिडे यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. नवरात्र उत्सवातील दांडिया हिंदू समाजाला गां*** बनवत चालला आहे. हे सर्व नाही चालणार नवरात्राचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही, असं भिडे यांनी म्हटलं आहे.

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) गुरुवारी (ता.३) एका कार्यक्रमानिमित्त सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. भिडे म्हणाले, "गणपती उत्सव, नवरात्र उत्सव हे आता इव्हेंट झाले असून ते हिंदू समाजाला गां*** बनवत आहेत. राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शुद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत".

"छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदू समाजाला जगाचा बाप व्हायचा मार्ग शिकवला आहे. पण गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे. नवरात्र उत्सवात दांडियाने हिंदू समाज गां*** बनवत चालला आहे. यापुढे हे सर्व नाही चालणार नाही. आम्ही नवरात्री उत्सवाचा (Navratri utsav 2024) बट्ट्याबोळ अजिबात होऊ देणार नाही. काही माता-भगिनी यांनी यापुढे स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी", असं आवाहन भिडेंनी केलं.

पुढे बोलताना भिडे म्हणाले, "नवरात्री उत्सवात सध्या करमणुकीचे कार्यक्रम सुरु आहे. हे सर्व नाश करीत चालले आहेत. आम्ही नवरात्रात होणारा बट्ट्याबोळ हाणून पाडू. आतापर्यंत ७६ राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमण केली. अजूनही ते आपला पाठलाग करीत आहेत. दुर्दैवाने आपण पाय लावून पळत आहोत".

हिंदी चिनी भाई-भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला होता, असं म्हणत भिडेंनी दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदूना शत्रू कोण, वैरी, वाईट कोण चांगलं कोण हे कळत नाही. महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात असल्याचं विधानही भिडे यांनी केलं. शिवाजी महाराजांच्या विचारांचा आपल्याला भारत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असंही भिडे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: हजारो रुपयांच्या केराटिन ट्रीटमेंट्स कशाला? या ७ घरगुती कंडिशनरने केस बनवतील सिल्की आणि सॉफ्ट

Manikrao Kokate : कोकाटेंचे मंत्रिपद, आमदारकी जाणार? अंजली दमानियांनी सांगितले कारण

New Year Celebration : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराचे अशा पध्दतीने करा भन्नाट डेकोरेशन

Manikrao Kokate : कोकाटेंची खाती कोणाला द्यायची ते सांगा?, मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना थेट सवाल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता; खात्यात ₹३००० कधी येणार?

SCROLL FOR NEXT