सांगली : राज्य सरकारने दारूची मुक्त विक्री करण्याचा घेतलेला निर्णय हा संतापजनक आहे. पावित्रा नाश करणारा निर्णय आहे. मला महाभाराताची आठवण येत आहे. मंत्री मंडळात या निर्णया विराेधात अथवा राग व्यक्त करण्यासाठी भीम नाही. ना दुर्योधन. आर. आर. पाटील (आबा) यांनी डान्स बार (dance bar) बंद केले. आज आबा असते तर हा घातकी, नीच निर्णय झालाच नसता. यातून नेमके काय साधायचे आहे मला कळत नाही असा सवाल शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी विचारला आहे. (shivpratisthan hindustan sambhaji bhide slams mva government on liquour sale in market)
संभाजी भिडे (sambhaji bhide) म्हणाले चीनने आपली भूमी लुबाडली. चायनीज फूड खाणारे आपला हिंदुस्तान आहे. अनेक पक्ष संघटना आहेत. आरक्षणासाठी हापापले आहेत. खरंत त्यांना सुपर मार्केटमध्ये दारुच्या विक्रीच्या विराेधात रान पेटवलं पाहिजे. हा निर्णय मागे घेण्यासाठी सर्वांनी आवाज उठवला पाहिजे. देशातील राज्यांना महाराष्ट्राला शिकवण दिली आहे. असे आदर्शवत राज्य महाराष्ट्र हे आहे. महाराष्ट्र (maharashtra) जर बेवकुफ झाला तर ते खपवून घेता कामा नये.
अनेक संघटना या विषयी रस्त्यावर आल्या पाहिजेत. विधानसभा मंदिरात हे ज्यांनी अंमलात आणले. त्यांना शिक्षा देण्याची गरज आहे. एक सुद्धा मंत्री आमदार यांनी असले पाप मी करणार नाही असे म्हटले नाही.हे अतिशय दुर्देवी आहे असे भिडे यांनी नमूद केले.
या प्रकरणी आम्ही मुख्यमंत्री यांच्याशी आणि पूर्ण मंत्रिमंडळातील लाेकांशी बोलणार आहे. हा घेतलेले निर्णय कसा चुकीचा आहे हे त्यांना पटवून देऊ. राज्याने असले बोलायचे नसते. समाजाला आपण दिशा द्यायची असते. राज्यकर्ते यांनी हा निर्णय घेऊन आई बापाची कुस बाटवली आहे.
राज्यपालांना मंत्री मंडळ बरखास्त करून टाका अशी मागणी करणार आहाेत असे संभाजी भिडे यांनी नमूद केले. नरेंद्र मोदी यांचे सरकार खरोखरच चांगले आहे असे काैतुक भिडे यांनी केले. ते म्हणाले घटनेत दुरुस्ती करण्यास आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहाेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.