Samarjeet Ghatge News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: कोल्हापूरच्या आखाड्यात शरद पवारांचा 'डाव', समरजित देतील मुश्रीफ यांना आव्हान, काय आहे राजकीय समीकरण?

Samarjeet Ghatge News: पवारांच्या कोल्हापूरच्या दौऱ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार के पी पाटील आणि जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी पवारांची भेट घेतली. त्यामुळे भाजपनंतर आता अजितदादांच्या राष्ट्रवादीलाही खिंडार पडणार असल्याचं दिसतंय.

Tanmay Tillu

शरद पवारांनी आगामी विधानसभेसाठी आपलं लक्ष पश्चिम महाराष्ट्रावर केंद्रित केलंय. पवारांनी आधी भाजपला धक्का दिल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे वळवलाय. पवारांच्या कोल्हापूरच्या दौऱ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार के पी पाटील आणि जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी पवारांची भेट घेतली. त्यामुळे भाजपनंतर आता अजितदादांच्या राष्ट्रवादीलाही खिंडार पडणार असल्याचं दिसतंय.

आगामी विधानसभेच्या दृष्टीनं शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात आधीच मोहरे हलवण्यास सुरुवात केली. समरजित घाटगेंची नाराजी ओळखून पवारांनी घाटगेंना आपल्या तंबूत घेतलं. पवारांच्या उपस्थितीत घाटगेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता घाटगेंनतर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहूल देसाईही तुतारी फुंकणार असल्याचं दिसतंय. मात्र सर्वाधिक चर्चा आहे ती फडणवीसांचे निकटवर्तीय समरजित घाटगेंची. घाटगेंनी भाजप का सोडलं ते जाणून घेऊ...

समरजित घाटगेंनी भाजप का सोडलं?

- कागलमध्ये मुश्रीफ आणि घाटगे पारंपरिक प्रतिस्पर्धी

- अजित पवारांसोबत मुश्रीफही सत्तेत आल्यानं कागलचा तिढा

- कागलमधून मुश्रीफच महायुतीचे उमेदवार असण्याची शक्यता

- भाजपला जागा सुटणार नसल्यानं घाटगेंची अडचण

- गेल्यावेळी अपक्ष लढून 88 हजार मतं मिळाल्यानं आता चिन्हावर लढण्याची तयारी

आगामी विधानसभेसाठी पवारांनी आपला मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवलाय. एकाच दगडात त्यांनी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय. के पी पाटील गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून राधानगरीतून रिंगणात होते. मात्र त्यांचा पराभव झाला. त्यांनी अजितदादांसोबत जाणं पसंत केलं.

मात्र आता त्यांनी पवारांची भेट घेतल्यामुळे त्यांच्याबाबत चर्चा सुरू झालीय. तर त्यांचे प्रतिस्पर्धी ए वाय पाटीलही राधानगरीतून इच्छुक असल्यामुळे त्यांनी तर थेट पवारांच्या कार्यक्रमातच हजेरी लावून उमेदवारीवर दावा ठोकलाय. त्यामुळे पवार कुणाच्या हातात तुतारी देतात याची उत्सुकता आहे. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहीलाय. राष्ट्रवादीतील फुटीनंतर काही आमदार अजित पवारांसोबत गेल्यानं राजकीय समीकरणं बदलली होती. मात्र आता खुद्द शरद पवारांनी आखाड्यात उतरुन डाव टाकल्याचं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT