Saam Impact News Hingoli Saam TV
महाराष्ट्र

Saam Impact: साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट; मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र लिहिणाऱ्या चिमुकल्या प्रतापला मिळणार हक्काचं घर

Saam Impact News Hingoli: हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या गोरेगाव येथील प्रताप जगन कावरखे या इयत्ता सहावीमधील मुलाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहीलं होतं.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली: दसऱ्याला पुरणपोळी खाल्ली नाही, दिवाळी तरी गोड करा असं भावनिक पत्र हिंगोलीतील (Hingoli) एका चिमुकल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवारी ९ ऑक्टोबरला लिहीलं होतं. ही बातमी सामटीव्हीने लावून धरली होती. चिमुकल्याने स्वतः लिहीलेलं पत्र सामटीव्हीने जशास तसं प्रकाशित केलं होतं. याबातमीची दखल आता थेट मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. याचा इम्पॅक्ट (Saam TV Impact) म्हणून हिंगोली जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी चिमुकल्या प्रतापच्या घरी भेट दिली आणि त्याच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर समाजकल्याण विभागाकडून प्रतापच्या शिक्षणाची जबाबदारी आणि कुटुंबाला घरकुल देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (Hingoli Latest News)

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या गोरेगाव येथील प्रताप जगन कावरखे या इयत्ता सहावीमधील मुलाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहीलं होतं. या पत्रात अनुदानाची रक्कम लवकर मिळावी म्हणून त्याने "साहेब, पैसे लवकर द्या, मग आई पुरणपोळ्या करेल, तुम्हीही खायला या... दसऱ्याला पुरणपोळी खाल्ली नाही, दिवाळी तरी गोड करा' अशी आर्त हाक दिली होती. सामटीव्हीने तेव्हापासूनच प्रतापचे पत्र जशास तसे प्रकाशित केले आणि वारंवार टीव्हीवर दाखवले होते. त्यामुळे थेट मुख्यमंत्री कार्यालयाला याची दखल घ्यावी लागली आणि हिंगोली जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी प्रतापच्या घरी गोरेगावला भेट दिली. यावेळी समाजकल्याण विभागाकडून प्रतापच्या शिक्षणाची जबाबदारी व कावरखे कुटुंबाला घरकुल देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Maharashtra News)

पाहा चिमुकल्याचं भावनिक पत्र -

यावेळी जिल्हा परिषदेच्या पथकाने प्रतापशी संवाद साधला. यात तो हुशार असल्याचे अधिकाऱ्यांना जाणवले. प्रतापला खूप शिकून डॉक्टर होत रुग्णांची सेवा करण्याचे त्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. प्रतापला वसतिगृहात ठेवायची तयारी असेल तर त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारी समाजकल्याण विभागाने दाखवली आहे. तसेच प्रतापच्या वडिलांच्या नावे फक्त २५ गुंठे जमीन आहे. बचत गटाद्वारे त्यांना वैयक्तिक स्वरूपात कर्ज देऊन लघुउद्योग सुरू करण्यासाठी कृषी विभागातर्फे मदत करण्याचे आश्वासन कृषी अधिकारी कानवडे यांनी दिले. त्यामुळे प्रतापला पुढील काही दिवसांतच हक्काचे घरकुल मिळणार आहे. यासोबतच अनेकांनी मदतीचे आश्वासन दिले. त्यामुळे सामटीव्हीच्या बातमीमुळे या चिमुकल्याची मोठी स्वप्न पुर्ण होण्याची सकारात्मत सुरुवात झाली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT