शिवाजी काळे, नवी दिल्ली
मुंबई: दोन गटात विभागलेल्या शिवसेनेला निवडणूक आयोगाने नवीन नावं दिली आहेत. तसेच काल, सोमवारी उद्धव ठाकरे गटाला 'मशाल' हे चिन्ह मिळाले होते. मात्र, शिंदे (Eknath Shinde) गटाने दिलेले पर्याय नाकारत निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पुन्हा तीन पर्याय देण्यास सांगितले होते. त्यानुसार आता शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन चिन्ह पाठवले आहेत. यात १) तळपता सुर्य २) ढाल-तलवार आणि ३) पिंपळाचं झाड हे तीन पर्याय शिंदे गटाने निवडणूक आयोगाला ई-मेलद्वारे पाठवले आहे. (Eknath Shinde Latest News)
काल, सोमवारी निवडणूक आयोगाने आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला मशाल हे चिन्ह दिलं आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव तर उद्धव ठाकरेंच्या गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांच्या नावाचा वाद मिटला असला तरी शिंदे यांच्या गटाच्या चिन्हाचा वाद मिटला नाहीये.
शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे सुरुवातील त्रिशुल, उगवता सुर्य आणि गदा ही चिन्ह मिळावी अशी मागणी केली होती. तर ठाकरे गटाने त्रिशुल, उगवता सुर्य, गदा आणि मशाल हे चिन्ह सादर केले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने दोन्ही गटांची धार्मिक चिन्ह फेटाळली होती. तर दुसरीकडे दोन्ही गटांनी त्रिशुल आणि उगवता सुर्य ही सारखी चिन्हे सादर केली होती त्यामुळे ही चिन्हे रद्द करण्यात आली होती. 'मशाल' हे चिन्ह ठाकरे गटाला मिळालं आहे. तर शिंदे गटाला चिन्हासाठी पुन्हा नव्याने पर्याय देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार शिंदे गटाकडून १) तळपता सुर्य २) ढाल-तलवार आणि ३) पिंपळाचं झाड हे तीन पर्याय निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत.
दरम्यान, शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव आयोगाकडून मिळाले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केलं आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय.आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…,#बाळासाहेबांची_शिवसेना अशाप्रकारे ट्विट करत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.