Eknath Shinde with balasaheb Thackeray
Eknath Shinde with balasaheb Thackeray saam tv

आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, अखेर विजय झाला, CM एकनाथ शिंदेंचं ट्विट चर्चेत

शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' नाव मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया...
Published on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोडी घडत असतानाचा आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव ठाकरे आणि शिंदे गटाला वापरता येणार नाही, असे आदेश दिल्यावर दोन्ही गटांची कोंडी झाली.

मात्र, आज आयोगाकडून ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले. तर शिंदे गटाला अद्यापही चिन्हा देण्यात आलं नाही. तसेच ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव आयोगाकडून मिळाले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. (Eknath Shinde latest tweet update)

Eknath Shinde with balasaheb Thackeray
Breaking : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' नाव मिळाले

मुख्यमंत्री शिंदे ट्विटरवर म्हणाले....

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय.आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…,#बाळासाहेबांची_शिवसेना अशाप्रकारे ट्विट करत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेच्या दोन्ही गटाचा वाद पुन्हा कोर्टात जाणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे गटाला कोणतंही चिन्ह देण्यात आलं नाही. मात्र, शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव मिळाले आहे. शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव मिळाल्यानंतर ठाकरे गट या निर्णयावर आक्षेप घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्याा दोन्ही गटाचा वाद कोर्टात जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com