Hingoli Farmer Get bullocks Pair  Saam Tv
महाराष्ट्र

Saam Tv Impact Video : मुलांना नांगराला जुंपलेलं बघून सरकार हळहळलं; शेतकऱ्यासाठी मोठी घोषणा, सामच्या बातमीची दखल!

Hingoli Farmer Get bullocks Pair : वसमत तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने बैलजोडी नसल्याने आपल्या मुलाला आणि लहान भावाला औताला जुंपलं होतं. याची बातमी साम टीव्हीने दाखवली होती. या बातमीची दखल घेत कृषीमंत्री धनंजय मुंडे त्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी सरसावलेत.

Bharat Jadhav

हिंगोली : बैल नसल्यामुळे मुलाला आणि लहान भावाला औताला जुपणाऱ्या शेतकऱ्याला बैलजोडी मिळणार आहे. सा टीव्ही हिंगोली येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची बातमी दाखवली होती. या बातमीची दखल घेत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी त्या शेतकऱ्याला बैलजोडी देण्याचा घोषणा केलीय.

बैल नसल्यामुळे भावाला आणि लहान मुलाला औताला जुंपण्याची वेळ एका शेतकऱ्यावर आली होती. ही घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या शिरळी गावात घडली होती. शेतीची मशागत करण्यासाठी बैल परवडत नाहीत म्हणून बालाजी पुंडगे या अल्पभूधारक शेतकऱ्याने भावालाच औताला जुंपलं होतं. या घटनेबाबतची बातमी Saam TV ने दाखवली होती आता साम टीव्हीने दाखवलेल्या या बातमीची दखल कृषीमंत्र्यांकडून घेण्यात आली. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी या शेतकऱ्याला बैलजोडी देण्याची घोषणा केलीय. अल्पभूधारक शेतकऱ्याची ही अवस्था बघता कृषिमंत्री त्यांना बैलजोडी देणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी पुंडगे हे पत्नी, मुलगा, एक मुलगीसोबत शिरळी गावाचे रविहवाशी आहेत. त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. याशिवाय मुलांचे शिक्षणही शेती व रोजमजूरीवर केलं जातं. या शेतात विहीर देखील आहे. पुंडगे हे मागील२०- २५ वर्षांपासून ते शेती करतात. यापूर्वी शेती करताना बैलजोडी मागून पेरणी व इतर कामे करीत होते. त्या बदल्यास त्या शेतकऱ्याकडे मजूरीचे काम करावे लागत होतं.

उत्पन्न वाढवण्यासाठी पारंपारीक पिकांऐवजी विहिरीच्या पाण्याचा उपयोग करत हळद लागवडीचा निर्णय घेतला. मात्र हळदीच्या बेडची कामे ट्रॅक्टरने होत नाहीत. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या पुंडगे यांनी दुसऱ्याकडे बैलजोडी मागितली. मात्र इतर शेतकऱ्यांच्याही पेरण्या बाकी असल्याने त्यांना कोणी बैलजोडी दिली नाही. बैलजोडीसाठी थांबले तर पेरणी होणार नाही आणि लागवडीला उशीर होईल, त्यातून उत्पादनात घट होईल, यामुळे त्यांनी लहान भाऊ आणि मुलाला औताला जुंपले. याची बातमी साम टीव्हीने दाखवली होती. या बातमीची दखल घेत कृषिमंत्र्यांनी त्यांना बैलजोडी देण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: मनमाडकरांना दिलासा; पाणी पुरवठा करणारे वागदरडी धरण 50 टक्के भरले

SCROLL FOR NEXT