sakhar gathi price rises by 40 rs per kg dhule and sambhajinagar saam tv
महाराष्ट्र

Sakhar Gathi : धुळ्यासह संभाजीनगरमध्ये साखर गाठीचा दर वधारला

होळी सणाला साखरगाठीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. लहान मुलांच्या गळ्यातही साखरगाठी घालून हा सण साजरा केला जातो. होळीच्या दिवशी महिला देखील साखरगाठीचे वेगवेगळे दागिने परिधान करतात तशी अनेक भागात प्रथा आहे.

Siddharth Latkar

- भूषण अहिरे / रामनाथ ढाकणे

Holi Festival 2024 :

होळी (holi) आणि गुढीपाडवा (gudipadwa 2024) या दोन्ही सणांसाठी साखर कंगन याला विशेष महत्त्व आहे. या दाेन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर साखर कंगन बनवण्याचे काम आणि विक्री धुळे (dhule) व छत्रपती संभाजीनगर (chhatrapati sambhajinagar) येथे सुरु आहे. बाजारात सध्या साखर गाठीचे दर सुमारे 20 ते 40 रुपयांपर्यंत वधारले आहेत. (Maharashtra News)

धुळे जिल्ह्यामध्ये साखर कंगन बनवण्याचा घरगुती व्यवसाय केला जातो. या साखर कंगन बनवण्याच्या हाताना वेग आला आहे. बाजारात देखील साखर कंगन विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आल्याचे पाहावयास मिळत आहे.

संभाजीनगर शहराला लागतात 50 टन साखरगाठी

होळी सणाला साखरगाठीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. लहान मुलांच्या गळ्यातही साखरगाठी घालून हा सण साजरा केला जातो. होळीच्या दिवशी महिला देखील साखरगाठीचे वेगवेगळे दागिने परिधान करतात तशी अनेक भागात प्रथा आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्रपती संंभाजीनगर शहरात यंदा साखरगाठीच्या दरात चाळीस रुपयांनी वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. साखरगाठीसाठी सागवानी साचे वापरले जातात. एक किलोचा साच्याचा दर 1हजार 500 रुपयांवरुन 3 हजार रुपयांवर पोहोचला आहे. तसेच 70 रुपये किलोचा लिंबू 200 रुपयांवर मिळतोय. परिणामी साखरगाठीच्या भावात चाळीस रुपयांची वाढ झाली आहे. सध्या साखरगाठी 240 रुपये 280 रुपये किलो असल्याचे विक्रेत्यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

General Knowledge: व्यक्तीच्या शिंकण्याचा वेग किती असतो?

Maharashtra Live News Update: पुण्यात भाजप आमदार, महापालिका आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांचा रिक्षाने एकत्रित प्रवास

Ajit Pawar: महायुती सरकार धारावी पुनर्विकास करूनच दाखवणार- अजित पवार|VIDEO

शाहजहाँने दिल्लीमध्येच का बनवला लाल किल्ला?

Raigad News: दरडग्रस्तांचं पुनर्वसन रखडलं; 44 कुटुंबांचा स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT